Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारात नितीश ‘राज’ प्रारंभ

बिहारात नितीश ‘राज’ प्रारंभ

=२२ मंत्र्यांसह घेतली शपथ=
nitish_kumarपाटणा, [२२ फेब्रुवारी] – बिहारात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आज रविवारी अखेर विराम मिळाला. जदयु नेते नितीशकुमार यांनी चौथ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच अन्य २२ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला.
राजभवनात आयोजित समारंभात नितीशकुमार यांना राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते मुख्यमंत्री जीतन राम मांझी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात तीन महिलांचाही समावेश करण्यात आला. नव्या २२ मंत्र्यांपैकी २० मंत्री पूर्वीच्या मांझी सरकारमध्येही होते. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत जदयुचा दारुण पराभव झाल्यानंतर नितीशकुमार यांनी १७ मे रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि २० मे रोजी जीतन राम मांझी यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. पण, मांझी यांनी कुमार यांच्या विरोधात बंड पुकारल्याने अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच मांझी यांनी विश्‍वासमताचा सामना न करता थेट राजभवन गाठून राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला होता.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीशकुमार यांनी केंद्र सरकारकडून बिहारला आवश्यक ते सहकार्य मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. केंद्राच्या सहकार्याशिवाय बिहारचा विकास शक्य नाही. इतर राज्यांप्रमाणेच केंद्र बिहारच्या विकासातही सहकार्य करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20825

Posted by on Feb 23 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (2023 of 2452 articles)


चेन्नई, [२१ फेब्रुवारी] - देशात बोलल्या जात असलेल्या अनेक भाषा हीच देशाची खरी संपत्ती असून, देशाला लाभलेला हा सांस्कृतिक वारसा ...

×