Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहारामधील कायदा, सुव्यवस्था चिंताजनक

बिहारामधील कायदा, सुव्यवस्था चिंताजनक

=रघुवंशप्रसादसिंह यांचा नितीशना घरचा अहेर=

The Union Minister for Rural Development, Dr. Raghuvansh Prasad Singh holding State-specific media briefing on Assam, in New Delhi on August 08, 2007.

The Union Minister for Rural Development, Dr. Raghuvansh Prasad Singh holding State-specific media briefing on Assam, in New Delhi on August 08, 2007.

पाटणा, [३१ डिसेंबर] – गेल्या काही दिवसांमध्ये तीन अभियंत्यांची निर्घृण हत्या आणि गुन्हेगारीच्या इतर घटनांच्या पार्श्‍वभूमीवर बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून जदयु आणि राजद हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणावी, या शब्दांत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे विश्‍वासू व माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसादसिंह यांनी घरचा अहेर दिला आहे.
बिहारमधील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, हे अभियंत्यांच्या झालेल्या खळबळजनक हत्यांवरून सिद्ध झाले आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे राजदचे उपाध्यक्ष असलेल्या रघुवंशप्रसादसिंह यांनी सांगितले. सरकारचे नेतृत्व करणार्‍या नितीशकुमार यांनी स्थिती आणखी खालावणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना कराव्या, असेही ते म्हणाले.
जदयुच्या नेत्यांना फक्त जयकार ऐकण्याची सवय झाली आहे आणि हे प्रकार कुठेतरी थांबण्याची गरज आहे. जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणार्‍या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईची गरज आहे, असे रघुवंशप्रसाद सिंह यांनी म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य जदयु नेत्यांच्या सहजासहजी पचनी पडले नाही.
कठीण काळातून बिहारला बाहेर काढण्याचा अनुभव नितीशकुमार यांना असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांना कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही. एखादा बालकही सल्ला देऊ शकतो, असे सांगून जदयु नेते व माजी मंत्री श्याम रजक यांनी रघुवंश यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26346

Posted by on Jan 2 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (960 of 2452 articles)


नवी दिल्ली, [३१ डिसेंबर] - काळ्या पैशाच्या निर्मितीला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून उद्या शुक्रवार १ जानेवारीपासून ५० हजार ...

×