Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहार निवडणुकीत तिसर्‍या आघाडीची उडी

बिहार निवडणुकीत तिसर्‍या आघाडीची उडी

=लालू, नितीश, कॉंग्रेसला झटका, सपा, राकॉं यांचा समावेश=
Mulayam-Singh-Yadav_1लखनौ, [१७ सप्टेंबर] – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता परिवाराला एकत्र आणण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर समाजवादी पक्षाच्या नेतृत्वात तिसर्‍या आघाडीची स्थापना करण्यात आली असून, यामुळे लालू, कॉंग्रेस यांचा समावेश असलेल्या आघाडीचे धाबे दणाणले आहे.
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथील विक्रमादित्य मार्गावरील सपा मुख्यालयात मुलायमसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री अखिलेश यादव, पश्‍चिम बंगाल सपाचे वरिष्ठ नेते किरयमय नंदा, सपाचे बिहार प्रदेशाध्यक्ष रामचंद्रसिंह यादव हे या बैठकीला उपस्थित होते. तिसर्‍या आघाडीत सपाशिवाय शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, पी. ए. संगमा यांचा पक्ष आणि बिहारचे नेते व माजी मंत्री देवेंद्र प्रसाद यादव यांच्या समाजवादी जनता दलाचा समावेश आहे, अशी माहिती सपा सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. तुम्ही भाजपाशी हातमिळवणी करत असल्याच्या आरोपाबाबत विचारले असता, राजकारणात असे आरोप होतच असतात, असे रामगोपाल यादव म्हणाले.
पाटण्यात बैठक
विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी पाटणा येथे तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांची उद्या शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत जागांसंबंधी चर्चा होईल, असेही यादव यांनी सांगितले. राष्ट्रीय जनता दलाचे माजी उपाध्यक्ष व बिहारमधील वरिष्ठ नेते रघुनाथ झा यावेळी उपस्थित होते व त्यांनी सपात प्रवेश केल्याचे यावेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. लालू, नितीश, कॉंग्रेस आघाडीने मनमानी पद्धतीने जागावाटप करून अपमान केल्याचा आरोप करून सपा, राकॉं यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. आता मुलायमसिंह यांच्या नेतृत्वात तिसर्‍या आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीत उडी घेतल्याने त्याचा थेट फायदा भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23851

Posted by on Sep 18 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1459 of 2452 articles)


१३ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आठ महिन्यांत पूर्ण करून चंद्राबाबूंचा विक्रम हैद्राबाद, [१७ सप्टेंबर] - गोदावरी व कृष्णा ...

×