Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहार निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय दले

बिहार निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय दले

=आयोगाची माहिती=
election-commission-1नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] – पुढील महिन्यापासून पाच टप्प्यात होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच ६२,७७९ मतदान केंद्रांवर केंद्रीय निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वच मतदान केंद्रांवर केंद्रीय दले तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काळ्या पैशाचा वापर रोखण्याच्या आणि मतदानकाळात कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या उद्देशाने केंद्रीय दलांसोबतच ३२३ निरीक्षक, २४३ सामान्य निरीक्षकही तैनात करण्यात येणार आहेत. बिहारमध्ये वीज कपात ही नित्याचीच समस्या असल्याने वीज गेल्यास मतदान प्रक्रियेवर कुठलाही परिणाम होणार नाही, यासाठी सर्वच मतदान केंद्रांमध्ये सौर दिवेही लावण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
बिहारमधील सर्वच मतदान केंद्रांवरील मतदान सुरळीत पार पडेल, याची काळजी आम्ही घेणार आहे. केंद्रीय दलांची प्रत्येक मतदान केंद्रांवर बारीक नजर राहणार आहे. प्रत्येक मतदान केंद्र निमलष्करी दलाच्या ताब्यात देण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे त्यांनी सांगितले. बिहारमध्ये १२ ऑक्टोबरपासून पाच टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर केंद्रीय दले तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23796

Posted by on Sep 14 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1475 of 2452 articles)


=राष्ट्रपतींचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [१४ सप्टेंबर] - भारताची प्राचीन संस्कृती आणि आधुनिक काळाची प्रगती यातील मुख्य दुवा म्हणजे आपली हिंदी ...

×