Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहार निवडणूक जदयु-राजद एकत्र लढणार

बिहार निवडणूक जदयु-राजद एकत्र लढणार

=मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप एकमत नाही=
lalu-yadav-nitish-kumarनवी दिल्ली, [७ जून] – आगामी बिहार विधानसभा निवडणूक संयुक्त जनता दल(जदयु) आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) एकत्रित लढणार असल्याची घोषणा आज रविवारी करण्यात आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याबाबत निर्माण झालेला संभ्रम काहीसा दूर झाला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी रविवारी झालेल्या बैठकीत युती करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दल सध्यातरी एकमत झाले नसल्याचे समजते. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासह मुलायमसिंह यादव व समाजवादी पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सपा नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की, बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक राजद-जदयु हे दोन्ही पक्ष युती करून लढवणार असून, जागावाटप करण्यासाठी सहा सदस्यांची एक समिती बनवण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य असतील. ही समिती कोणता पक्ष किती जागा लढवेल, याबाबत आपले मत देणार आहे.
बिहारच्या मुख्यमंत्रिपदी कोण राहील, असे पत्रकारांनी विचारले असता रामगोपाल यादव यांनी या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले. वास्तव हे आहे की, नितीशकुमार स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानत आहेत. पण, अद्याप राजदने नितीशकुमार यांच्या दावेदारीला पाठिंबा दिलेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरूनच जदयु व राजद या मुख्य पक्षांमध्ये अद्याप कोणतीही सहमती झाली नसल्याचे समजते. मुलायसिंहांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक संपल्यावर नितीशकुमार हे सर्वात आधी बाहेर पडताना दिसले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22736

Posted by on Jun 8 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1651 of 2452 articles)


=सीआयएसएफच्या जवानांची तैनाती= नवी दिल्ली, [७ जून] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा ...

×