Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात

बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात

=रामविलास पासवान यांची माहिती=
ramvilas paswan3ramvilas paswan3ramvilas paswan3पाटणा, [२८ जानेवारी] – रालोआतील मुख्य घटक असलेला भाजपा हा आम्हाला मोठ्या भावासारखा आहे आणि बिहारमध्ये याचवर्षी होणारी विधानसभेची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत, अशी माहिती लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे दिली.
बिहार निवडणुकीत रालोआतील घटक पक्षांमध्ये जागावाटप हा फार मोठा मुद्दा राहणार नाही. लोजपाला किती जागा मिळतील, हादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. आपल्या पक्षाला इतक्याच जागा मिळायला हव्या, असा आग्रहदेखील मी करणार नाही, असे पासवान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कोणी किती जागा लढवाव्या आणि कुठून लढावे, हा रालोआतील अंतर्गत मुद्दा आहे आणि घटक पक्षांच्या बैठकीतच तो सोडविला जाणार आहे. राज्यातून जदयुला सत्तेबाहेर करणे, हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20139

Posted by on Jan 29 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (2155 of 2452 articles)


बराक ओबामा यांचे मत तीन दिवसांच्या ऐतिहासिक भारत दौर्‍याची सांगता नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - विविध धर्म, संस्कृती आणि ...

×