Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » बिहार निवडणूक मोदी सरकारची परीक्षाच

बिहार निवडणूक मोदी सरकारची परीक्षाच

=नितीन गडकरी यांचे मत=
Nitin-Gadkari1नवी दिल्ली, [२२ ऑगस्ट] – बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक ही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या सव्वा वर्षाच्या कारकिर्दीवर सार्वमतच ठरणार आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज शनिवारी व्यक्त केले.
देशातील प्रत्येकच निवडणूक केंद्रात सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षासाठी, पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी तसेच पंतप्रधानांसाठी परीक्षाच ठरत असते. कारण, सत्तारूढ पक्ष हा देशभरात एक चमू म्हणून कार्य करीत असतो. त्यामुळे बिहार निवडणुकीकडेही आम्ही परीक्षा म्हणूनच पाहात आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.
या देशातील तरुण मतदार नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत. जातीयतेच्या राजकारणात त्यांना कोणीही ओढू शकत नाही. याच मतदारांच्या बळावर आम्ही बिहार निवडणुकीतही विजय प्राप्त करू, असा विश्‍वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
मतदारांना आता मतांचे राजकारण नको आहे, त्यांना विकास हवा आहे, चांगले रस्ते, उद्योग हवे आहेत. जाती व धर्माच्या राजकारणात त्यांना कोणतीही आवड नाही. तसेही जातिधर्माच्या राजकारणावर आम्ही गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीतच मात केली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विकास कामांचा धडाका देशवासीयांनी अनुभवला असल्याने ते केवळ भाजपालाच मतदान करतील. लोकसभा निवडणुकीत भाजपाला जे यश मिळाले, तसेच यश बिहारमध्येही मिळेल. कारण, बिहारवासीयांना पंतप्रधानांच्या विकासात्मक अजेंड्यावर पूर्ण विश्‍वास आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23665

Posted by on Aug 23 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1513 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२२ ऑगस्ट] - जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेली स्पर्धा म्हणजे फिफाकडून आयोजित केली जाणारी फुटबॉल विश्‍वचषक आणि जगात सर्वाधिक ...

×