Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » बीबीसीच्या कार्यालयात असंख्य लैंगिक अत्याचार

बीबीसीच्या कार्यालयात असंख्य लैंगिक अत्याचार

=ब्रिटनच्या राजकीय नेत्याचा गौप्यस्फोट=
bbc_0न्यूयॉर्क, [१० मार्च] – १६/१२ रोजीच्या निर्भया सामूहिक बलात्कारावर लघुपट तयार करून तो निर्लज्जपणे प्रसारित करणार्‍या बीबीसी अर्थातच ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या कार्यालयातच कर्मचार्‍यांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. पण, बीबीसीने हे सर्वच प्रकरणे दाबून ठेवली आहेत, असा गौप्यस्फोट ब्रिटनमधीलच एका बड्या राजकीय नेत्याने केला आहे.
बीबीसीतील कर्मचार्‍यांनी महिला आणि शंभरावर लहान मुलांवर लैंगिक व अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. पण, त्याबद्दल या कंपनीने कधीच एक शब्दही काढला नाही. उलट, या दोषी कर्मचार्‍यांना वाचविण्याचाच प्रयत्न केला आहे, असा दावा या नेत्याने केला आहे. यातील सर्वाधिक अत्याचार बीबीसीचा प्रसिद्ध प्रस्तुतकर्ता असलेल्या जिमी सॅव्हिलेन याने केले आहेत. त्याच्यावर लघुपटही तयार करण्यात आला होता. त्याचे प्रसारण स्वत: बीबीसीनेच रद्द केले होते. हा लघुपट डिसेंबर २०११ मध्ये न्यूजनाईट या कार्यक्रमात दाखवला जाणार होता.
सॅव्हिलेनवरील आरोपांचा तपास करणार्‍या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, १९५५ ते २००९ या कालावधीत त्याने ८ ते १६ या वयोगटातील मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यात ९० टक्के मुलींचा समावेश आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21259

Posted by on Mar 11 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1945 of 2458 articles)


=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन= गाझियाबाद, [१० मार्च] - केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारसाठी राष्ट्राची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. भाजपा घटक असलेले जम्मू-काश्मिरातील ...

×