Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » बीबीसीने भारतावर बलात्कारच केला

बीबीसीने भारतावर बलात्कारच केला

=मुलायमसिंह यांच्या सुनेचा संताप=
BBCलखनौ, [१० मार्च] – भारत सरकारने बंदी घातली असतानाही राजधानी दिल्लीतील १६/१२ रोजीच्या भीषण सामूहिक बलात्कारावर आधारित लघुपट प्रदर्शित करून बीबीसीने एकप्रकारे भारताच्या सभ्यता व संस्कृतीवर बलात्कारच केला, असा थेट आरोप समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी केला आहे.
निर्भयावरील बलात्कारावर आधारित या लघुपटाच्या भारतात आणि विदेशातील प्रदर्शनावर केंद्र सरकारने बंदी घातली होती. असे असतानाही बीबीसीने हा लघुपट अनेक देशांमध्ये दाखविला. सोमवारी आग्रा येथेही तो दाखविण्यात आला. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज मंगळवारी लखनो येथे सपाने निषेध आंदोलन केले. यात सहभागी होत अपर्णा यादव यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.
हा लघुपट मी बघितला नाही. पण त्याबद्दल वाचले आहे. सरकारच्या बंदी आदेशानंतरही बीबीसीने त्याचे प्रसारण करून भारताच्या सभ्यतेचा आणि लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेचाही अपमान केला आहे. या लघुपटात देशाची चुकीची प्रतिमा रंगविण्यात आली आहे. बीबीसी जे काही करीत आहे, ते एखाद्या बलात्कारासारखेच आहे. यामुळे भारतातील पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21253

Posted by on Mar 11 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1942 of 2453 articles)


ब्युनोस आयर्स, [१० मार्च] - ‘युरोपियन रिऍलिटी शो’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी आकाशात झेपावलेल्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर झाली. ...

×