Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » बुद्धांच्या शिकवणुकीतूनच नेपाळचे दु:ख दूर करू : पंतप्रधान

बुद्धांच्या शिकवणुकीतूनच नेपाळचे दु:ख दूर करू : पंतप्रधान

narendra_modi11नवी दिल्ली, [४ मे] – गौतम बुद्धांची जन्मभूमी नेपाळ आज भूकंपासारख्या संकटाशी झूंज देत आहे. भारतवासीयांना तेथील नागरिकांचे अश्रू पुसायचे असून, त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी शक्य ती सर्व मदत करायची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले.
बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून येथील तालकटोरा स्टडियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.
गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यास आज जगात जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत, त्यापासून मुक्ती मिळू शकते, असे सांगून ते म्हणाले की, गौतम बुद्धांनी दिलेल्या करुणेच्या संदेशाधारे आज जीवन जगण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. सत्ता व वैभवाला त्यागणे मोठे कठीण आहे. पण बुद्धांनी राजपाटासह सर्वस्वाचा त्याग करून समाज कल्याणाचा मार्ग अनुसरला. गौतम बुद्धांनी दिलेल्या या शिकवणुकीतूनच नेपाळ या नैसर्गिक संकटातून सावरेल आणि विकासाच्या मार्गावरून वाटचाल करेल. नेपाळमध्ये निर्माण झालेल्या या संकटाला आज आपण ओझे समजत आहोत, पण त्याचे संधीत रूपांतर केल्यास नेपाळी जनतेची स्थिती पूर्वपदावर आणू शकतो, असा आपल्याला विश्‍वास असल्याचेही मोदी पुढे म्हणाले. याच कार्यक्रमात एक मिनीट मौन पाळून उपस्थितांनी नेपाळमधील भूकंपात मरण पावलेल्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली.
ज्ञानप्राप्तीनंतर तेज:पूंज बनलेल्या गौतम बुद्धांनी संघटन शक्तीचे महत्त्व ओळखले होते. संघटित होऊन विकास साधण्याचा मंत्र त्यांनी मानव जातीला दिल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. २१ वे शतक हे आशियाचे राहणार आहे. पण गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास तसे म्हणण्याला अर्थ आहे, असे सांगून मोदी यांनी, ज्या कामगाराच्या घामावर आपण विकास साधतो त्याच्या श्रमाचे चीज व्हावे म्हणून गौतम बुद्धांनी कामगार दिनाची परिकल्पना केली होती, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
समाज कल्याणाबाबत मार्गदर्शन करताना गौतम बुद्धांनी सांगितले की, दुसर्‍याचे कल्याण केल्याशिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. ही दुसर्‍याचे कल्याण करण्याची संधी आपल्याला नेपाळमधील परिस्थितीने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगात जगाला मागदर्शक ठरणार्‍या गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा अवलंब आपण करू या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी शेवटी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22419

Posted by on May 5 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1724 of 2453 articles)


=येचुरी यांची टीका= नवी दिल्ली, [४ मे] - विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करणारी आणि उद्योगांना कर सवलत देणारी नरेंद्र मोदी सरकारची ...

×