Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » बॅलेटचे बुलेटला सडेतोड उत्तर

बॅलेटचे बुलेटला सडेतोड उत्तर

  • लोकशाहीवरील विश्‍वासाचे हे प्रतीकच
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

NARENDRA MODI_1उधमपूर, [२८ नोव्हेंबर] – दहशतवाद्यांच्या बंदुकीची भीती झुगारून जम्मू-काश्मिरातील मतदारांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ‘बुलेट’ला ‘बॅलेट’ने सडेतोड उत्तर दिले आहे. येथील नागरिकांचा आपल्या देशाच्या लोकशाहीवर अगाध विश्‍वास असल्याचेच हे प्रतीक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी येथे केले.
विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात भाजपाच्या दोन निवडणूक सभांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल कॉन्फरन्स, कॉंगे्रस आणि पीडीपी या तिन्ही पक्षांना चांगलेच धारेवर धरले. या सर्वच पक्षांनी राज्यात सत्तेचे सुख उपभोगले. पण, विकास कुणीही केला नाही. पृथ्वीचे नंदनवन असलेले हे राज्य गेल्या ३० वर्षांत होते तिथेच आहे. या तिन्ही पक्षांनी आपापल्या सत्ताकाळात निव्वळ भ्रष्टाचार केला आणि राज्याचे वैभव लुटले, असा आरोप मोदी यांनी केला.
फुटीरतावादी संघटनांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. हे लोक बुलेटच्या माध्यमातून बॅलेटवर विजय मिळवू पाहात होते. पण, इतिहासात प्रथमच येथील नागरिकांनी स्वत:च्या शक्तीचा परिचय करून दिला आणि विक्रमी मतदानाची नोंद केली. हा पहिला टप्पा म्हणजे, लोकशाहीचा विजय आणि दहशतवादाचा पराभव करणाराच होता. या टप्प्यातून संपूर्ण जगात अतिशय ठोस संदेश गेला आहे, असेही मोदी म्हणाले.
येथे मी निवडणूक प्रचाराकरिता दुसर्‍यांदा आलो आहे. पहिल्या सभेच्या वेळी मी किश्तवाडच्या चिनाबला गेलो होतो. बंदुकीचे भय मनातून काढा आणि मतदान करा, असे आवाहन मी केले होते. त्यामुळे या विक्रमी मतदानासाठी मतदारच खर्‍या अर्थाने अभिनंदनाला पात्र आहेत. त्यांच्यामुळेच लोकशाहीचा विजय झाला आहे. या सर्व मतदारांचे मी अभिनंदन करतो. बंदुका, बॉम्बची भीती दाखविल्यानंतर आणि निष्पाप नागरिकांची हत्या केल्यानंतरही इतक्या प्रचंड प्रमाणात मतदान झाल्याने अतिरेकी निराश झाले आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले.
या विक्रमी मतदानामुळे संपूर्ण जगाला ठोस संदेश गेला आहे. शेजारील देश काहीही आरडाओरड करीत असले, तरी आमच्या मनात नेमके काय आहे, हे येथील जनतेने दाखवून दिले आहे. तुमची ही कामगिरी फार मोलाची आहे, असे सांगताना, उर्वरित टप्प्यांमध्येही असेच विक्रमी मतदान करा आणि भाजपाला स्पष्ट बहुमताने विजयी करा, असे आवाहन मोदी यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18691

Posted by on Nov 29 2014. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2330 of 2452 articles)


=क्रिकेट वर्तुळात शोककळा= सिडनी, [२७ नोव्हेंबर] - तीन दिवसांपूर्वी शेफिल्ड शिल्ड सामन्यात एक उसळता चेंडू खेळण्याच्या नादात डोक्याला गंभीर दुखापत ...

×