Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » बोलताना जास्त सावधगिरी बाळगा

बोलताना जास्त सावधगिरी बाळगा

  • राजनाथसिंह यांचा सल्ला
  • किरन रिजिजू, व्ही. के. सिन्हा यांना दिली समज

rajnath singh3नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – आपल्या विधानांनी चर्चेत आलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजिजू यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कानउघाडणी करीत, बोेलताना आणखी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
आमच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, वा आम्हाला तसे म्हणायचे नव्हते, असे म्हणत आम्ही आपली सुटका करून घेऊ शकत नाही. तर जेव्हा आम्ही बोलतो, तेव्हाच जास्त खबरदारी घेतली पाहिजे, असे राजनाथसिंह यांनी आज शुक्रवारी स्पष्ट केले. आपल्या विधानावर दोघांनीही स्पष्टीकरण दिले आहे, याकडेही राजनाथसिंह यांनी लक्ष वेधले.
व्ही. के. सिंह आणि किरन रिजिजू यांनी केलेल्या विधानाने वादळ निर्माण झाले, एवढेच नाही तर भाजपाही अडचणीत आली. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांच्याही विधानांचा सोयीस्कर वापर करण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखल्यामुळे भाजपाची स्थिती काहीशी अडचणीची झाली.
सत्तारूढ पक्षाचा नेता म्हणून कोणतेही विधान करताना, आपण जास्त सावधगिरी बाळगली पाहिजे, असे मला वाटते. आपल्या विधानातून कोणताही वेगळा अर्थ निघणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे आणि जबाबदारीने विधान केले पाहिजे, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
हरयाणातील घटनेबाबत आपली हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्याशी चर्चा झाली असून, आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
याआधी अशीच वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणारे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान, भाजपा खासदार साक्षी महाराज आणि उत्तरप्रदेशातील भाजपाचे आमदार संगीत सोम यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा मुख्यालयात बोलवून कठोर समज दिली होती.
यानंतर भाजपा नेत्यांकडून वा मंत्र्यांकडून अशी विधाने येणार नाहीत, अशी अपेक्षा सर्वजण करत असताना जनरल व्ही. के. सिंह आणि किरन रिजिजू यांनी वादग्रस्त विधाने करीत, पक्षाला अडचणीत आणले. विशेष म्हणजे दोघांनीही आपल्या विधानबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आम्हाला तसे म्हणायचे नव्हते, आमच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असा खुलासा केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25265

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1300 of 2453 articles)


=उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर मागणी= मुंबई, [२३ ऑक्टोबर] - स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख ...

×