Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी कामत यांची नियुक्ती

ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी कामत यांची नियुक्ती

=पहिला मान भारताला=
K V kamathनवी दिल्ली, [११ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठोस पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रसमुहाच्या बँकेच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ के. व्ही. कामत यांची आज सोमवारी नियुक्ती करण्यात आली. या बँकेचे अध्यक्षपद भूषविण्याचा पहिला मान भारतालाच मिळाला आहे.
ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ‘ब्रिक्स’ राष्ट्रसमुहाचे सदस्य आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच ‘ब्रिक्स’ समुहाच्या परिषदेत सदस्य राष्ट्रांना कठीण काळात तातडीने मदत करणारी बँक स्थापन करण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर लगेच १०० अब्ज डॉलर्सच्या निधीसह या बँकेची स्थापना करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेवर केवळ अमेरिका आणि युरोपचेच वर्चस्व असल्याने ही ‘ब्रिक्स’ बँक या जागतिक वित्तीय संस्थांना तोड देणारीच ठरणार आहे.
के. व्ही. कामत यांची या बँकेचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ सचिव राजीव मेहर्षी यांनी पत्रकारांना दिली. या बँकेचे खेळते भांडवल ५० अब्ज डॉलर्स इतके राहणार असून, यात प्रत्येक सदस्य राष्ट्राला आगामी सात वर्षेपर्यंत १० अब्ज डॉलर्सचे योगदान द्यायचे आहे. याशिवाय, हमी स्वरूपात प्रत्येक देशाला ४० अब्ज डॉलर्स जमा करावे लागणार आहे. या बँकेचे सदस्य होण्याची इच्छा असणार्‍या अन्य देशांकडूनही आणखी ५० अब्ज डॉलर्सचा निधी जमा होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22495

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1709 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ मे] - सर्वसामान्य नागरिकांसाठी तीन महत्त्वाकांक्षी योजनांचे लोकार्पण केल्यानंतर आणि जनधन योजना अभूतपूर्व यशस्वी केल्यानंतर केंद्रातील नरेंद्र ...

×