ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे
Tuesday, November 24th, 2015=५० टक्के नागरिकांचे मत=
लंडन, [२४ नोव्हेंबर] – पॅरिस येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ५० टक्क्यांपेक्षा जास्त ब्रिटिश नागरिकांना युरोपियन युनियनमधून ब्रिटनने बाहेर पडावे, असे वाटत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणांतर्गत ब्रिटनमधील ५२ टक्के नागरिकांनी युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली आहे. युरोपियन युनियन स्वीकारत असलेल्या निर्वासितांच्या संख्येमुळे ब्रिटनमधील जनमतावर परिणाम झाल्याचा अंदाज आहे.
ब्रिटनमध्ये युरोपियन युनियनमध्ये रहावे अथवा नाही, यासाठी येथे सार्वमत घेतले जाणार आहे. हे सार्वमत २०१७ वर्षाच्या अखेरीस घेतले जाईल, असे आश्वासन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेेरुन यांनी दिले आहे. कॅमेरून हे युरोपियन युनियनमध्ये सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास या संघटनेस तो अत्यंत मोठा धक्का असेल, असे मानले जात आहे.
मात्र, ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास ब्रिटिश अर्थव्यवस्थेस मोठा धक्का बसेल; शिवाय ब्रिटनच्या एकतेसंदर्भात अत्यंत कळीच्या मानल्या जाणार्या स्कॉटलंडच्या संवेदनशील मुद्यास पुन्हा धक्का लागण्याची भीती युरोपियन युनियन व ब्रिटनच्या एकत्रीकरणाच्या बाजूच्या असलेल्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25712

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!