Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ब्रिटन पुन्हा कॅमरून यांचेच

ब्रिटन पुन्हा कॅमरून यांचेच

=हुजूर पक्ष बहुमताजवळ=
david-cameronलंडन, [८ मे] – ब्रिटनवासियांनी पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांच्या हुजूर पक्षावरच विश्‍वास व्यक्त केला आहे. ६५० जागा असलेल्या ब्रिटन संसदेसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर लगेच हाती घेण्यात आलेल्या मतमोजणीत बहुतेक सर्वच जागांचे निकाल जाहीर झाले असून, यात कॅमरून यांच्या पार्टीला ३१५ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी ३२६ जागा आवश्यक असल्या, तरी कॅमरून पुन्हा एकदा मित्र पक्षांच्या मदतीने ब्रिटनमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुख्य विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाला २२८ जागा मिळाल्या आहेत. तर, स्कॉटिश नॅशनल पार्टीला ५६, लिबरल डेमोकॅ्रटस्ला ८, युके इन्डिपेंडन्स पार्टीला एक आणि इतर लहान पक्षांना २३ जागा मिळाल्या आहेत.
मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यांमध्येही कॅमरून यांचीच पार्टी सत्तेवर येणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते. या चाचण्यांमध्ये हुजूर पक्षाला किमान ३१६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो आकडा या पार्टीने गाठला आहे. लिबरल डेमॉकॅ्रटस् हा सत्तारूढ आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असून, या पक्षाला आठ जागा मिळाल्या असल्याने बहुमताचा आकडा प्राप्त करणे कॅमरून यांना कठीण जाणार नाही. सुमारे पाच कोटी मतदारांनी गुरुवारी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क पार पाडला होता.
मजूर पक्षाला स्कॉटलंडमध्ये फार मोठा फटका बसला आहे. स्कॉटिश नॅशनल पार्टीने या भागात जोरदार मुसंडी मारत ५६ जागांवर कब्जा केला आहे. लंडनमध्येही मजूर पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. डेव्हिड कॅमरून हे विटने मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या शुभेच्छा
डेव्हीड कॅमरून यांच्या पार्टीने निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. तुमच्या नेतृत्वात भारत आणि ब्रिटनचे संबंध आणखी मजबूत होतील. ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22450

Posted by on May 9 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1723 of 2458 articles)


नवी दिल्ली, [८ मे] - सिंगापूरच्या एका कंपनीने मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या सायबर हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ...

×