Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ब्रुसेल्सवर दहशतवादी हल्ला

ब्रुसेल्सवर दहशतवादी हल्ला

  • तीन बॉम्बस्फोटांत २१ ठार; ३५ जखमी
  • •विमानतळ, मेट्रो आणि अमिरातच्या कार्यालयाला केले लक्ष्य

brussels-stays-on-high-alert-for-terrorist-attackबु्रसेल्स, [२२ मार्च] – बेल्जियमची राजधानी बु्रसेल्स आज मंगळवारी तीन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. येथील मुख्य विमानतळावर आणि मेट्रो स्थानक भागात झालेल्या स्फोटांमध्ये २१ जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातच्या कार्यालय परिसरातही एक स्फोट झाल्याचे वृत्त आहे.
बेल्जियम पोलिसांनी गेल्या आठवड्यात इसिसचा वरिष्ठ नेता आणि पॅरीस हल्ल्याचा सूत्रधार सालह अब्देसलामला बेड्या ठोकल्या होत्या. त्याचाच बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवून आणले असल्याची माहिती आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सकाळी आठच्या सुमारास विमानतळाच्या बहिर्गमन परिसरात एकाचवेळी दोन स्फोट झाले. यानंतर लगेच आकाशात धुराचा मोठा लोट उठला. स्फोट होताच लोकांमध्ये धावपळ उडाली. आपला जीव वाचविण्यासाठी प्रत्येकच जण प्रयत्न करीत होता. यातही काही जण जखमी झालेत. बाहेरच मेट्रो रेल्वेचे जाळे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही काळासाठी मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली होती. शहरातून विमानतळाकडे येणार्‍या प्रत्येक मार्गावर तपासनाके बसवून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
या स्फोटांमध्ये नेमके किती जण जखमी झाले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही. जखमींना विविध रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले असून, अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान, देशाच्या काही प्रमुख भागांमध्ये सरकारने आणिबाणी जाहीर केली असून, इसिसच्या संशयित अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम उघडण्यात आली आहे. स्फोट होण्यापूर्वी काही लोकांनी या भागात बेछूट गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. हे हल्लेखोर अरबी भाषेत ओरडत होते आणि इसिसचा जयजयकारही करीत होते.
भारतीय सुरक्षित
या भागात वास्तव्यास असलेले सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असून, त्यांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती येथील भारतीय दूतावासाच्या हवाल्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली.
पंतप्रधानांचा दौरा होणारच
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी बेल्जियमच्या दौर्‍यावर जाणार आहेत. दौर्‍याला काही दिवस शिल्लक असताना, हा दहशतवादी हल्ला झाला असला, तरी पंतप्रधान ठरल्यानुसारच या देशाचा दौरा करणार असल्याचे स्वरूप यांनी स्पष्ट केले.
इसिसने घेतली जबाबदारी
या तिन्ही बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिस या जहाल दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्याला अटक केल्याचा सूड म्हणून आम्ही हे स्फोट घडवून आणले असल्याचे या संघटनेच्या वृत्तात म्हटले आहे.
भारतात हायअलर्ट
या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतातील सर्वच आंतरराष्ट्रीय विमातळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, गोवा, चेन्नई या विमानतळांचा प्रामुख्याने समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यावर तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांनाही सांत्वना दिली आहे.
गायक अभिजितची पत्नी-मुलगा सुखरूप
बु्रसेल्स येथील विमानतळावर भारतीय पार्श्‍वगायक अभिजित भट्टाचार्य याची पत्नी व मुलगा अडकले होते. ते दोघेही सुखरूप असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आताच माझे त्यांच्याशी बोलणे झाले, असे ट्विट अभिजितने केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27552

Posted by on Mar 23 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (583 of 2458 articles)


मुंबई, [२२ मार्च] - शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पदांच्या मंजुरीबाबत लवकरच शासन निर्णय घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान ...

×