Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भगतसिंग यांचीही झाली हेरगिरी

भगतसिंग यांचीही झाली हेरगिरी

=पुतण्या अभयसिंगचा दावा, फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी=
Bhagat-Singhचंदीगड, [१२ एप्रिल] – देशाच्या स्वातंत्र्यासाठी तरुण वयात हसत हसत फासावर चढणारे शहीद भगतसिंग यांचीही गुप्तचर संस्थांनी हेरगिरी केली होती, असा दावा त्यांचा पुतण्या अभयसिंग संधू यांनी केला असून, भगतसिंग यांच्याशी संबंधित सर्व दस्तावेज सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या कुटुंबीयांची दोन दशके हेरगिरी केल्याचा खुलासा झाल्यानंतर तापलेले वातावरण अद्याप शांत झाले नसतानाच अभयसिंग यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमच्या कुटुंबीयांवर अनेक वर्षे पाळत ठेवली गेली. दूरध्वनीवर होणार्‍या आमच्या संभाषणाचीदेखील अनेक वर्षे हेरगिरी झाली. ब्रिटिश काळापासूनच आमच्या कुटुंबाची हेरगिरी सुरू होती आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक वर्षे गुप्तचर संस्था आमच्यावर पाळत ठेवून होत्या, असा दावा ५७ वर्षीय अभयसिंग संधू यांनी मोहाली येथे पत्रकारांशी बोलताना केला. भगतसिंग आणि त्यांचे काका स्वातंत्र्यसेनानी सरदार अजितसिंग यांच्याशी संबंधित सर्व फाईल्स सरकारने सार्वजनिक कराव्या, अशी मागणी संधू यांनी केली. ब्रिटिश सरकारने शहीद भगतसिंग आणि अजितसिंग यांच्याबद्दल लिहिलेल्या सर्व गोष्टी जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्यामुळे या संबंधीचे सर्व दस्तावेज सार्वजनिक झाले पाहिजे आणि विद्यमान सरकार याबाबत लवकरच ठोस पावले उचलेल, अशी आम्हाला आशा असल्याचेही संधू यावेळी म्हणाले. त्याकाळी आमच्या घरी संबंधित विभागाचे कर्मचारी नोकर म्हणून कामाला येऊन हेरगिरी करीत असे, अशी माहितीही त्यांनी दिली.
अभयसिंग संधू हे भगतसिंग यांचे १९१४ मध्ये जन्मलेले लहान बंधू सरदार कुलबीरसिंग यांचे पुत्र आहेत. कुलबीरसिंग फिरोजपूर येथून जनसंघाचे आमदारही राहिले आहेत. वडील कुलबीरसिंग यांनी राष्ट्रीय अभिलेखागारात ठेवण्यात आलेल्या दोघांशी संबंधित फाईल्स व रेकॉडर्‌‌स मिळविण्याचा प्रयत्न केला होता, असेही संधू म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21980

Posted by on Apr 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1801 of 2453 articles)


=जनरल व्ही. के. सिंह यांचा गंभीर आरोप= नवी दिल्ली, [१२ एप्रिल] - शस्त्रास्त्र दलालांच्या इशार्‍यावर काम करणारा मीडियाचा एक समूह ...

×