भरत तोगडिया हत्येप्रकरणी तिघांना अटक
Monday, May 16th, 2016सुरत, [१५ मे] – विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांचे चुरत भाऊ भरत तोगडिया त्यांच्यासह तिघांच्या हत्येप्रकरणी सुरत पोलिसांनी आज रविवारी तीन आरोपींना अटक केली आहे.
अमरेली जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारात खंडणी मागितली असता, भरत तोगडिया यांचा मित्र बालू हिराणीने ती देण्यास नकार दिला. यावरूनच हे हत्याकांड घडले असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या हत्याकांडात एकूण सात आरोपी असून, उर्वरित चौघांचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, या हत्याकांडावरून भाजपाच्या विरोधकांनी भाजपावर जोरदार हल्ला चढविला आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी गुजरातमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी राज्यात कायदा व सुव्वस्था अस्तित्वातच नाही, अशी टीका केली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=28252

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!