Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भविष्यात सायबर युद्धाचा धोका

भविष्यात सायबर युद्धाचा धोका

=संरक्षण मंत्री पर्रीकर यांचा इशारा, लष्कराला दिला सावधानतेचा सल्ला=
manohar-parrikar_99नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – भविष्यातील युद्ध कदाचित सायबर क्षेत्रात लढले जाईल, असा स्पष्ट इशारा देताना, या सायबर युद्धात महत्त्वपूर्ण माहिती देखील नष्ट होईल. महत्त्वाची माहिती या सायबर हल्ल्यातही सुरक्षित ठेवण्यासाठी लष्कराने सतर्क राहाण्याची गरज आहे, असा सल्ला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सोमवारी दिला.
पर्रीकर यांनी यावेळी इसिस या जहाल दहशतवादी संघटनेचे उदाहरण दिले. कू्ररता हाच इसिसचा एकमेव उद्देश आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी ही जहाल संघटना इंटरनेट तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे वापर करीत आहे, याकडे पर्रीकर यांनी लक्ष वेधले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने प्रचंड प्रगती साधली आहे आणि या आधारे जागतिक व्यवहारांत आपला देश प्रभावी भूमिका पार पाडू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अतिशय सक्षम असा लष्करी सिद्धांत तयार करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त विकास करण्याची गरज आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी भारतीय लष्कर आणि सीआयआयने संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना सांगितले.
भविष्यातील युद्ध हे सायबर क्षेत्रातच लढले जाण्याची शक्यता असल्याने माहिती तंत्रज्ञानाची यात अतिशय महत्त्वाची भूमिका राहणार आहे. तथापि, युद्ध हे युद्धच असल्याने लष्कराची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, त्यांना हे युद्ध लढणे शक्य होणार नाही, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25687

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1168 of 2453 articles)


=आरबीआयचे स्पष्ट संकेत= नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] - केंद्र सरकारच्या धडक पावलांमुळे आर्थिक सुधारणांना गती मिळाली असली आणि घाऊक व ...

×