Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भाई बर्धन यांच्यावर आज अंत्यसंस्कार

भाई बर्धन यांच्यावर आज अंत्यसंस्कार

a b bardhanनवी दिल्ली, [३ जानेवारी] – कामगारांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाकपाचे ज्येष्ठ नेते ए. बी. उर्फ भाई बर्धन यांच्या पार्थिवावर उद्या सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दीर्घ आजाराने बर्धन यांचे शनिवारी रात्री वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले होते.
बर्धन यांचे पार्थिव आज दिवसभरच भाकपाचे येथील मुख्यालय असलेल्या अजय भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. आज सकाळपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासह समाजातील सर्वच स्तरांवरील लोकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाईल, अशी माहिती भाकपाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
डाव्या चळवळीतील सर्वांत ज्येष्ठ नेते असलेले बर्धन यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत अतिशय जवळचे संबंध होते. राजकारणात त्यांना सन्मानाचे स्थान लाभले होते. गेल्या महिन्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर येथील जी. बी. पंत रुग्णालयात भरती करण्यात आले होते. शुक्रवारपासूनच त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. अखेर शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली होती. कामगार चळवळीचा आधारस्तंभ हरपला, अशा भावना अनेकांनी त्यांच्या निधनावर व्यक्त केल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26399

Posted by on Jan 4 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (944 of 2453 articles)


=ट्रायचे दूरसंचार कंपन्यांना निर्देश= नवी दिल्ली, [३ जानेवारी] - दूरसंचार कंपन्यांनी कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल ग्राहकांना लगेच त्याची नुकसान भरपाई ...

×