Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » भाजपाचा माकप-कॉंग्रेसला धक्का

भाजपाचा माकप-कॉंग्रेसला धक्का

=७० जागांवरील हातचा विजय हिरावला=
bjp BENGALकोलकाता, [२३ मे] – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ तीन जागांवरच विजय मिळविता आला असला, तरी या पक्षाने माकप-कॉंग्रेस आघाडीला मोठा धक्का दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सुमारे ७० जागांवर भाजपाने या आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून वंचित ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पश्‍चिम बंगालमध्ये १७.५ टक्के मते मिळाली होती. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची मते १०.२० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. असे असले, तरी भाजपाने राज्यात स्वबळावर तीन जागा जिंकल्या आहेत.
मतांची टक्केवारी कमी झाली असतानाही भाजपाने जी कामगिरी केली, त्यावर पक्षनेतृत्व खुश आहे. कारण, २०११ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ १९.५० लाख मते मिळाली होती, तर यावेळी ५६ लाख मते मिळाली आहेत. २९४ पैकी २६२ मतदारसंघांमध्ये भाजपाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना दहा हजारांपेक्षा जास्त मिळाली असल्याचे दिसून आले आहे. ६६ मतदारसंघांमध्ये भाजपा उमेदवारांनी २० ते ३० हजार, १६ जागांवर ३० ते ४० हजार आणि सहा जागांवर ४० ते ५० हजार मते मिळवली आहेत. याचा सर्वाधिक फटका माकप-कॉंगे्रस आघाडीला बसला आहे. कारण, सुमारे ७० मतदारसंघांमध्ये या आघाडीच्या उमेदवारांचा तृणमूल कॉंगे्रसच्या उमेदवारांनी २० ते ४० हजार मतांच्या फरकानेच पराभव केला आहे. भाजपाने जर या आघाडीला हा धक्का दिला नसता, तर आजचे राज्यातील चित्र काही वेगळेच असते, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28438

Posted by on May 24 2016. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बंगाल, राज्य (286 of 2452 articles)


=भारत इतिहास रचणार= चेन्नई/नवी दिल्ली, [२२ मे] - हवामान पोषक राहिले आणि वार्‍याची गती नियंत्रणात राहिली, तर भारत उद्या सोमवारी ...

×