भाजपाची तिसरी यादी जाहीर
Monday, September 21st, 2015=बिहार विधानसभा निवडणूक=
नवी दिल्ली, [२० सप्टेंबर] – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज रविवारी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत ११ उमेदवार असून, यासोबतच, तिन्ही याद्या मिळून भाजपाने आतापर्यंत १५३ मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
२४३ सदस्यीय बिहार विधानसभेत भाजपा १६० जागांवर लढणार आहे. यातील १५३ उमेदवार जाहीर झाले असून, उर्वरित सात उमेदवारांची यादी येत्या एक-दोन दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. उर्वरित ८३ जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने शनिवारी रात्री ९९ उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली होती. यात २०१० च्या निवडणुकीत राघोपूर मतदारसंघात राबडीदेवींचा पराभव करणारे जदयुचे आमदार सतीशकुमार यांना भाजपाने राघोपूर क्षेत्रातूनच उमेदवारी दिली आहे.
पासवानांच्या जावयाचे बंड
दरम्यान, लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे जावई अनिल कुमार साधू यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. पैसे देणार्यालाच निवडणुकीचे तिकीट दिले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. पक्षातील अनेक रहस्य मला माहीत आहेत. निवडणूक प्रचार काळात मी ते जाहीर करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. चिराग पासवान हे अहंकारी असून, स्वत:ला बिहारचा पुत्र म्हणविणारे चिराग ‘फ्लॉप हिरो’ आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=23960

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!