Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भाजपाची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर

भाजपाची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर

  • उपाध्यक्ष- आ. चैनसुख संचेती, खा. नाना पटोले, आ. सुनील देशमुख, सुधाकर देशमुख
  • सरचिटणीस संघटकपदी प्रा. रवींद्र भुसारी
  • कोषाध्यक्ष- शायना एन.सी.

Maharashtra bjpमुंबई, [११ जून] – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आपली नवी चमू जाहीर केली असून, त्यामध्ये उपाध्यक्ष पदावर विदर्भातील आमदार चैनसुख संचेती, डॉ. सुनील देशमुख, खा. नाना पटोले आमदार सुधाकर देशमुख यांची वर्णी लागली आहे. ५७ सदस्यीय या राज्य कार्यकारिणीमध्ये १४ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस, १२ चिटणीस, ४ कार्यालय प्रतिनिधी, ७ विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि ८ प्रवक्त्यांचा समावेश आहे.
नुकतीच कोल्हापूर येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आलेल्या खा. रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी आपल्या नव्या चमूची घोषणा केली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सरचिटणीस संघटन, कोषाध्यक्ष, कार्यालय मंत्री, कार्यालय प्रभारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, आदिवासी मोर्चा, अल्पसंख्यक मोर्चा, शेतकरी आघाडी मोर्चा, प्रवक्ते आणि सात नव्या जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे.
उपाध्यक्ष
आ. चैनसुख संचेती, आ. सुनील देशमुख, सुधाकर देशमुख, खा. नाना पटोले यांच्यासह आ. मंगलप्रभात लोढा, सुभाष देशमुख, नीता केळकर, सुरेश खाडे, भास्कर खतगावकर, कांताताई नलावडे, गोविंद केंद्रे, भागवत कराड, बाळासाहेब गावडे, शिवाजी कांबळे यांची निवड करण्यात आली असून सरचिटणीसपदी
सुजितसिंह ठाकूर, आ. संभाजी पाटील निलंगेकर पाटील, अतुल भातखळकर डॉ. रामदास आंबटकर यांची, तर सरचिटणीस संघटनपदी प्रा. रवींद्र भुसारी यांची वर्णी लागली आहे.
कोषाध्यक्ष म्हणून शायना एन्सी, चिटणीस : योगेश गोगावले, डॉ. विनय नातू, सौ. मंजुळा गावित, अतुल भोसले, आ. स्मिताताई वाघ, नरेंद्र पवार, श्रीमती मायाताई इवनाते, स्नेहलता कोल्हे, राजन तेली, अर्चना वाणी, मनोज पांगारकर आणि संजय पांडे यांची निवड करण्यात आली. प्रवक्ते म्हणून माधव भांडारी, मधु चव्हाण, आ. राम कदम, केशव उपाध्ये, प्रा. सुहास फरांदे, गिरीश व्यास, शिरीष बोराळकर आणि गणेश हाके यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
विविध आघाड्या : युवा मोर्चा अध्यक्ष – योगेश टिळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष – माधवी नाईक, अनुसूचित जाती अध्यक्ष – सुभाष पारधी, आदिवासी मोर्चा अध्यक्ष – खा. अशोक नेते, अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष -जमाल सिद्धीकी, शेतकरी आघाडी अध्यक्ष – ज्ञानोबा मुंडे.
याशिवाय अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भानुदास बेरड, जालना – रामेश्‍वर भादरंगे, पालघर -आ. पास्कल धनारे, लातूर – शैलेश लाहोटी, परभणी शहर- आनंद भरोसे, ठाणे शहर- आ. संजय केळकर, सोलापूर शहर- अशोक निबरंगी यांना निवडण्यात आले आहे.
कार्यालय प्रतिनिधी : कार्यालय प्रभारी – प्रतापभाई आशर, कार्यालय मंत्री – मुकुंद कुलकर्णी, सहकार्यालय मंत्री – शरद चव्हाण, भरत राऊत हे काम पाहणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22830

Posted by on Jun 12 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1629 of 2451 articles)


=महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण= मुंबई, [११ जून] - कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या आणि राजधानी नवी दिल्लीतील राज्याची शान म्हणून ...

×