Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार

भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार

=नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निर्धार=
Raosaheb-Patil-Danveमुंबई, [८ जानेवारी] – भारतीय जनता पार्टीचे काम राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचा आपला निर्धार असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात एक कोटी प्राथमिक सदस्य नोंदविण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्‍वास भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केला.
महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांचे गुरुवारी प्रथमच मुंबईत आगमन झाले. प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दानवे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दानवे यांनी हा निर्धार व्यक्त केला. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभारही मानले.
दानवे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून सरकार व संघटना यांच्यात समन्वय ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल. सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत, ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पक्ष संघटना करेल. यापुढे सरकार व पक्ष हे दोघे एकत्रपणे चांगले काम करतील.
ते म्हणाले, आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्यामध्ये पक्षाला विजयी करणे, हे आपले लक्ष्य आहे. मार्च महिन्यापर्यंत सर्व जिल्ह्यांचा दौरा करून राज्यात पक्षाचे एक कोटी प्राथमिक सदस्य करणार आहोत. राज्यात पक्षाचे मंत्री व पदाधिकार्‍यांनी प्रत्येकी सात दिवस सदस्यता नोंदणीसाठी देण्याचा संकल्प केला आहे. सर्वांच्या सहकार्याने नोंदणीचे उद्दिष्ट गाठू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, रावसाहेबांच्या रूपाने पक्ष व सरकारमध्ये भक्कम दुवा निर्माण झाला आहे. त्यांना सरपंच ते केंद्रीय मंत्रिपदाचा कामाचा अनुभव असून, त्यांच्याकडून सरकारला मार्गदर्शन मिळेल. सरकारचे काम जनतेपर्यंत व जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविणे, अशी कामगिरी त्यांच्या नेतृत्वात पक्षाकडून होईल.
यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र भुसारी, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, गृह राज्यमंत्री रणजित पाटील व राम शिंदे, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आ. संभाजी पाटील निलंगेकर, मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार, खा. संजय काका पाटील, खा. कपिल पाटील, खा. ए. टी. नाना पाटील आदी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19500

Posted by on Jan 9 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2272 of 2451 articles)


=रेल्वेमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना सूचना= मुंबई, [८ जानेवारी] - शहराची रक्तवाहिनी समजल्या जाणार्‍या लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना केंद्रीय ...

×