Home » ठळक बातम्या, म.प्रदेश, राज्य » भाजपाचे संकेतस्थळ हॅक

भाजपाचे संकेतस्थळ हॅक

bjp-flagभोपाळ, [१९ ऑगस्ट] – मध्यप्रदेश भाजपाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर मुसलमानांना मारणे बंद करा, अशा मजकुरासोबतच पाकिस्तानचा झेंडा अपलोड करण्यात आला आहे.
पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर व भारतातील मुस्लिमांना मारणे बंद करा, असा मजकूर संकेतस्थळाच्या मुख्य पानावर आज शुक्रवारी प्रसिद्ध झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते.
भाजपाच्या संकेतस्थळासारखे दिसणारे हे संकेतस्थळ कुणीतरी तयार केले आहे. भाजपाचे हे अधिकृत संकेतस्थळ नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे संकेतस्थळ बंद करण्याबाबत सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती मध्यप्रदेश भाजपाचे संयोजक विकास बोंद्रिया यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29227

Posted by on Aug 21 2016. Filed under ठळक बातम्या, म.प्रदेश, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, म.प्रदेश, राज्य (111 of 2452 articles)


=पंतप्रधान मोदी यांची ग्वाही= नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] - गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात महाविनाशकारी भूकंपाने उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्वसनासाठी भारत ...

×