भाजपाचे २१ दिवसांचे ‘विकास पर्व’
Wednesday, May 25th, 2016=मोदी सरकारची दोन वर्षे, २०० केंद्रांतून देणार विकास कामांची माहिती=
नवी दिल्ली, [२४ मे] – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या २६ मे रोजी सत्तेतील दोन वर्षे पूर्ण करीत आहे. या दोन वर्षांतील सरकारच्या विकास कामांची माहिती जनतेला देण्यासाठी भाजपाने देशभरातील २०० केंद्रांची निवड केली असून, २६ मे ते १५ जून या कालावधीत २१ दिवसांचे ‘विकास पर्व’ पाळण्याचीही घोषणा भाजपातर्फे यावेळी करण्यात आली.
भाजपाने विकास कामांची माहिती जनतेला देण्यासाठी ३३ चमू गठित केल्या असून, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पक्षनेत्यांचा समावेश असलेली प्रत्येक चमू या विकास पर्वाच्या काळात सहा ते सात केंद्रांना भेट देणार आहेत, अशी माहिती पक्षातील उच्चस्तरीय सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
विरोधकांनी महत्त्वाच्या विधेयकांचा मार्ग कसा रोखून धरला, विकास कामांमध्ये कसे अडथळे आणले आणि अशा कठीण स्थितीवर मात करून सरकारने अतिशय कमी कालावधीत जनतेच्या हितात किती निर्णय घेतले आणि योजना राबविल्या, हे जनतेला सांगण्याची संधी विकास पर्वाच्या माध्यमातून भाजपाला मिळणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व राज्यांच्या मीडिया प्रमुख, मंत्री आणि विभाग प्रमुखांना पाठविण्यात आल्या आहेत.
या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा उद्योगपती, शेतकरी आणि महिला संघटनांसोबत बैठका घेणार आहे. याशिवाय पत्रपरिषदा, विशेष मुलाखती आणि कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत, असे सूत्राने सांगितले.
याच अनुषंगाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व खासदारांना दोन दिवस आणि एक रात्र आपापल्या मतदारसंघात घालवून, तेथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठका आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यसभेतील रालोआच्या खासदारांनाही त्यांच्या गृहजिल्ह्यात अशाच प्रकारच्या बैठका घेण्यास सांगण्यात आले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=28503

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!