|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.42° C

कमाल तापमान : 32.13° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 5.79 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.13° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 32.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear
Home » राजकीय, राष्ट्रीय » भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक लवकरच दिल्लीत

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक लवकरच दिल्लीत

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर – भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या तिसर्‍या वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही बैठक होणार असल्याचे समजते.
गोवा, पंजाब, गुजरात, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली नाही. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे.
नड्डा यांनी आजच आपल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. भाजपासाठी गुजरात आणि उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. भाजपाने या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. या पाचही राज्यांसाठी निवडणूक निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे.
उत्तरप्रदेशचे निवडणूक प्रभारी म्हणून शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच राज्यात तीन सहप्रभारीही देण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपाने अपना दल आणि निषाद पक्षाशी आघाडी केली आहे.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युवा मोचार्र्च्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन नड्डा यांनी मंगळवारी भाजयुमो राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केले होते.

Posted by : | on : 7 Oct 2021
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g