Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भाजपातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार

भाजपातर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार

=दीक्षाभूमीला दिला ‘अ’ वर्ग दर्जा=
devendra fadnavisमुंबई, [११ मार्च] – नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचा पर्यटन स्थळ म्हणून असलेला जुना ‘क’ वर्ग रद्द करून त्या ऐवजी ‘अ’ वर्ग देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला.
मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, आमदार नाना शामकुळे, संजय सावकारे, डॉ. मिलिंद माने, रमेश बुंदिले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे व विकास कुंभारे, नागपूरचे महापौर प्रवीण दटके, मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुखदेव अडागळे, चंद्रकांत हिवराळे, कार्यकारिणी सदस्य रघुवीर तुरेकर व मोर्चाचे कार्यालय मंत्री आनंद शिंदे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्यात प्रथमच डॉ. आंबेडकरांसंबंधित स्थानाला प्रथमच ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे दीक्षाभूमीचा अधिक विकास होईल व तेथे येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील.
यावेळी सुभाष पारधी म्हणाले की, भाजपा सरकारने दीक्षाभूमीला पर्यटन स्थळ म्हणून ‘अ’ वर्ग दिल्यामुळे बाबासाहेबांवर श्रद्धा असलेल्या लाखो बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने बाबासाहेबांच्या महान कर्तृत्वाला सलाम केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दीक्षाभूमीला भेट देणार्‍या लाखो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभारी आहोत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा होतो. या ठिकाणी उभारलेला भव्य स्तुप पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. देशभरातील बोधगया शहरातव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधीवृक्ष आहे. त्यामुळे देश-विदेशातील लाखो पर्यटक दीक्षाभूमीला भेट देतात. यापूर्वी दीक्षाभूमीला ‘क’ वर्ग देण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा केली होती. त्यानुसार पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने मान्य केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27240

Posted by on Mar 12 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (689 of 2451 articles)


=मराठी भाषा बंधनकारक= मुंबई, [११ मार्च] - केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आय.जी.सी.एस.ई. व आय.बी.या महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत मराठी भाषा ...

×