Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भाजपाला पराभव स्वीकारावा लागेल : पवार

भाजपाला पराभव स्वीकारावा लागेल : पवार

SHARAD PAWARमुंबई, [२७ फेब्रुवारी] – सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेची धुंदी चढली असल्याची टीका करताना आगामी काळात पाच राज्यात होणार्‍या विधानसभघ निवडणुकीत भाजपाला पराभव स्वीकारावा लागेल, असे भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता स्थानिक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कार्यकर्तांना संबोधित करताना पवार म्हणाले की, देशातील सद्य परिस्थिती बघता भाजपाच्या पदरी अपयशच येणार आहे. सत्ता हातात असताना पाय जमिनीवर ठेवणे आवश्यक असते. पण सत्ताधार्‍यांच्या डोक्यात हवा शिरली आहे.
आमच्या सरकारच्या काळात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. तसा एकतरी निर्णय या सरकारने घेऊन दाखवावा, असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत राज्यातील गुंतवणुकीची आकडेवारी खोटी आहे. आरटीआयच्या माध्यमातून सत्य उजेडात येईलच, असेही शरद पवार म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26913

Posted by on Feb 28 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (804 of 2451 articles)


कोच्ची, [२७ फेब्रुवारी] - भारतीय दंड विधानातील देशद्रोहाचे कलम रद्द करण्यात यावे, या मागणीने जोर धरला असतानाच २१ व्या शतकातील ...

×