Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » भाजपाला रोखण्यासाठी ‘नितीश’चे विष प्यायलो

भाजपाला रोखण्यासाठी ‘नितीश’चे विष प्यायलो

=लालूंनी दाखवला आपला खरा चेहरा=
laluprasad-yadavनवी दिल्ली, [९ जून] – बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठीच मनात इच्छा नसतानाही नितीशकुमार नावाचे विष पिणे मला भाग पडले आहे. माझा नाईलाज झाला, असे वक्तव्य करून राजदचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी एकप्रकारे आपला खरा चेहराच जनता परिवाराला दाखविला आहे.
भाजपा हा जातीयवादी साप आहे आणि या सापाला रोखण्यासाठी कोणतेही विष पिण्याची माझी तयारी आहे. नितीशकुमार यांना बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यास माझा विरोध होता. पण, माझ्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे इच्छा नसतानाही त्यांना आपला नेता म्हणून स्वीकारणे मला भाग पडले आहे, असे लालूप्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीत जदयु, राजद, कॉंगे्रस आणि अन्य लहान-मोठे राजकीय पक्ष पूर्णपणे साफ झाले होते. हा पराभव जिव्हारी लागल्याने राजकारणात नेहमीच एकमेकांना पाण्यात पाहणारे सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि जदयुचे अध्यक्ष शरद यादव तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र येणे भाग पडले आहे. तथापि, जनता परिवाराच्या महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, यावरून या नेत्यांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला. विशेषत: लालूप्रसाद यांनी नितीशकुमार यांना नेता मानण्यास जाहीरपणे नकार दिला होता. त्यामुळे जनता परिवाराचे विलिनीकरणही अडचणीत आले होते. भाजपाला कोणत्याही स्थितीत रोखण्याची गरज लक्षात घेऊन अखेर मुलायमसिंह यांनी त्यांचे व्याही असलेले लालूप्रसाद यादव यांची समजूत काढली. त्यामुळे नाईलाजाने का होईना, लालूंनी नितीशकुमार यांना नेता म्हणून स्वीकारले असले, तरी आज त्यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढलीच.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22785

Posted by on Jun 10 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1643 of 2452 articles)


=अंमलबजावणी पुढील वर्षापासून: शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती= मुंबई, [८ जून] - दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ...

×