Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » भाजपासाठी विनाशकारी ठरेल जनता परिवार

भाजपासाठी विनाशकारी ठरेल जनता परिवार

=नितीशकुमार यांचा दावा=
nitish_kumarपाटणा, [१६ एप्रिल] – जनता परिवारातील सहा पक्षांनी एकत्र येण्याचा बुधवारी घेतलेला निर्णय भारतीय जनता पक्षासाठी विनाशकारी ठरेल, असा दावा जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी केला.
ज्या जनता परिवाराच्या एकत्रिकरणाची भाजपा खिल्ली उडवत आहे तो आपल्यासाठी विनाशकारी ठरणार याची त्या पक्षाला कल्पना नाही, असे नितीशकुमार यांनी आज गुरुवारी नवी दिल्लीहून परतल्यानंतर पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकत्र आलेल्या जनता परिवारातील सर्व सहा पक्षांच्या अध्यक्षांची एक समिती स्थापन करण्यात आली असून, नव्या पक्षाशी संबंधित सर्व बाबींवर ही समिती विचार करेल. नव्या पक्षाचे नाव, धोरण, कार्यक्रम, झेंडा आणि निवडणूक चिन्ह निश्‍चित करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे, असे नितीश पुढे म्हणाले. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह केव्हा घोषित केले जाईल, असे विचारले असता जदयु अध्यक्ष शरद यादव यासंदर्भात पुढाकार घेतील. ते बैठक बोलावून विचारविनिमय करतील आणि त्याप्रमाणे घोषणा केली जाईल, असे नितीश म्हणाले. जनता परिवारातील पक्ष एकत्र आल्यामुळे राज्य सरकारच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यताही नितीशकुमार यांनी फेटाळून लावली. सरकार पूर्वीप्रमाणेच विकास आणि सुशासनाच्या अजेंड्यासह राज्याच्या जनतेची सेवा करत राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असलेला संयुक्त जनता दल (जदयु), समाजवादी पक्ष, देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल, इंडियन नॅशनल लोकदल, समाजवादी जनता पार्टी आणि लालूप्रसाद यादव यांचा राजद या सहा पक्षांनी बुधवारी नवी दिल्ली येथे एकत्र येऊन नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. बिहार आणि त्यानंतर उत्तरप्रदेशात होणारी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे पक्ष एकत्र आले असले तरी या पक्षांचा इतिहास लक्षात घेता हे नेते किती दिवस एकत्र राहू शकतील, याबाबत राजकीय वर्तुळात शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22118

Posted by on Apr 16 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1781 of 2452 articles)


मुंबई, [१५ एप्रिल] - वांद्रे (पूर्व) निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय झाला असून नारायण राणे यांचा पराभव झाला ...

×