Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भाजपासाठी सरकार नाही, राष्ट्र महत्त्वाचे

भाजपासाठी सरकार नाही, राष्ट्र महत्त्वाचे

=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन=
rajnathsingh2गाझियाबाद, [१० मार्च] – केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारसाठी राष्ट्राची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. भाजपा घटक असलेले जम्मू-काश्मिरातील सरकार टिकणार की नाही, हा आमच्यासाठी चिंतेचा विषयच नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी येथे केले.
फुटीरतावादी नेता मसरत आलमची मुक्तता आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि राष्ट्रीय एकात्मतेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारीच लोकसभेत स्पष्ट केले होते. त्याच अनुषंगाने राजनाथसिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
आपले सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी कधीच आणि कुठल्याही किमतीत तडजोड करणार नाही. राष्ट्राच्या सुरक्षेपुढे भाजपाचे स्वबळाचेच काय, तर युती सरकारही आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. आमचा हेतू एकदम स्पष्ट आहे आणि तो तुम्ही समजून घ्यायला हवा. सोमवारी संसदेतही मी अशाच प्रकारची भूमिका स्पष्ट केली होती, असे राजनाथसिंह म्हणाले. गाझियाबाद येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ४६ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या अनुषंगाने ते पत्रकारांशी बोलत होते.
मसरत आलमच्या मुक्ततेबाबत जम्मू-काश्मीर सरकारने दिलेल्या अहवालावर आपण मुळीच समाधानी नाही. राज्य सरकारकडून मी आणखी काही माहिती आणि स्पष्टीकरण मागितले आहे. ते प्राप्त झाल्यानंतरच मी आता भाष्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21257

Posted by on Mar 11 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1941 of 2453 articles)


=मुलायमसिंह यांच्या सुनेचा संताप= लखनौ, [१० मार्च] - भारत सरकारने बंदी घातली असतानाही राजधानी दिल्लीतील १६/१२ रोजीच्या भीषण सामूहिक बलात्कारावर ...

×