Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष : जेटली

भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष : जेटली

=दिल्ली प्रदेश भाजपाची बैठक=
arun jaitley5नवी दिल्ली, [२६ मार्च] – भाजपा राष्ट्रवादाने भारलेला पक्ष आहे, जेव्हा देश तोडण्याचा प्रयत्न होईल, तेव्हा त्याविरोधात भाजपा सर्वप्रथम आवाज उठवेल, मैदानात उतरेल, असा इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिला.
दिल्ली प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी बैठकीचे उद्‌घाटन करताना जेटली बोलत होते. यावेळी दिल्ली प्रदेश भाजपाचे प्रभारी श्याम जाजू, राष्ट्रीय मंत्री तरुण चुग, दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष सतीश उपाध्याय आणि अन्य नेते उपस्थित होते. दिल्लीच्या छतरपूर परिसरातील ओसिएएन मार्गावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने या बैठकीचा प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रविरोधी नारे देणार्‍यांचे समर्थन करणारे आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर, त्यांच्या देशावर असणार्‍या निष्ठेवर संशय घेत आहेत, हेच आमच्यासमोरील खरे वैचारिक आव्हान आहे, असे जेटली म्हणाले.
जे लोक भारत माता की जय म्हणायला तयार नव्हते, ते आता जयहिंद म्हणायला लागले आहेत, हा आमच्या वैचारिक प्रयत्नांचा विजय आहे, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, मोदी सरकार हे प्रामाणिक आणि पारदर्शी असल्याचे सरकारचे कट्टर विरोधकही मान्य करू लागले आहेत. पावणेदोन वर्षांच्या काळात खूप चांगले काम केले आहे. सरकारची ही उपलब्धी कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे कॉंग्रेस पूर्णपणे खचून गेली आहे, तिची ताकद संपली आहे. आपमुळेही लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे, त्यामुळे लोक आता आपच्या नाटकांबद्दल खुलेआम बोलत आहे. त्यामुळे दिल्लीतील लढाई आता आप आणि भाजपात आहे, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.
आता राजकारण जाहीर सभांमधून नाही तर वाहिन्यांवरील चर्चेतून होत असते, त्यामुळे दिल्ली भाजपाने वाहिन्यांवरील चर्चेत पूर्ण तयारीने भाग घेऊ शकतील, अशी ३०-४० जणांची चमू तयार केली पाहिजे, अशी सूचना जेटली यांनी केली.
अरुणाचलमधील कॉंग्रेसचे सरकार गेले, उत्तराखंडमधील सरकार कधी जाते, ते आता पाहायचे, असे जेटली म्हणाले. दिवसभर चाललेल्या या बैठकीला तरुण चुग, श्याम जाजू, सतीश उपाध्याय यांनी संबोधित केले. दिल्ली मनपा निवडणुकीबद्दलही या बैठकीत चर्चा झाली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27582

Posted by on Mar 27 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (570 of 2453 articles)


मेलबर्न, [२६ मार्च] - कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी सध्या बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. काही कंपन्या नवीन तंत्रज्ञानाच्या वॉशिंग ...

×