Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक

bjp-flagनवी दिल्ली, [१७ मार्च] – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीला राजधानी दिल्लीत शनिवार १९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणार्‍या या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
जंतरमंतर परिसरातील एनडीएमसीच्या सभागृहात होणार्‍या या बैठकीचे उद्‌घाटन भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी दुपारी ४ वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने रविवारी या बैठकीचा समारोप होईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा बुधवार १६ मार्चला संपला आहेे. त्याहिशेबानेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर उद्या शुक्रवार १८ मार्चला भाजपा महामंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता भाजपा पदधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय विषयांवरील अनेक प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मुद्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीपूर्वी अध्यक्ष अमित शाह पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचीही शक्यता आहे.
अमित शाह यांनी आपल्या पहिल्या पूर्ण कालावधीसाठी भाजपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर होणारी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची याआधीची बैठक बंगळुरू येथे मागील वर्षी म्हणजे एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. या बैठकीची जय्यत तयारी राजधानीत सुरू आहे. भाजपाचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि अन्य पदाधिकार्‍यांनी गुरुवारी दुपारी एनडीएमसी सेंटरला भेट देऊन बैठकीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27399

Posted by on Mar 18 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (630 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१७ मार्च] - बहुमत नसल्यामुळे राज्यसभेला कमजोर करण्याचा, त्याचे महत्त्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी ...

×