Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत अर्थसंकल्पाचे स्वागत

भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत अर्थसंकल्पाचे स्वागत

=पीक वीमा योजना सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा : पंतप्रधान=
NARENDRA MODI_1नवी दिल्ली, [१ मार्च] – पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या फायद्याची आहे. या योजनेचा फायदा सर्व शेतकर्‍यांना मिळावा म्हणून ही योजना देशातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी येथे केले.
भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. आज सकाळी संसदभवनात झालेल्या या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
आजपर्यंत कोणत्याच सरकारने शेतकर्‍यांसाठी काही केले नाही. भाजपा सरकारने पहिल्यांदा शेतकर्‍यांचा हिताचा विचार करीत त्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना आणल्या, या सर्व योजना शेतकर्‍यांपयर्र्त पोहोचवा, असे कळकळीचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
प्रारंभी या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली. अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी शेतकर्‍यांच्या कल्याणाचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन केले.
जेटली यांच्या अर्थसंकल्पाने अन्नदात्याच्या भूमिकेत असलेला शेतकरी आता भारतभाग्य विधात्याच्या भूमिकेत आला आहे, असे शाह म्हणाले. बैठकीत उपस्थित केंद्रीय मंत्री आणि अन्य खासदारांनी अर्थसंकल्पाबद्दल सरकारचे अभिनंदन केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26977

Posted by on Mar 2 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (786 of 2453 articles)


शेतकर्‍यांसाठी कमी प्रीमिअमची विमा योजना आयकर मर्यादा ‘जैसे थे’ पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांना तीन हजारांची सूट रस्ते, रेल्वे विकासावर ...

×