Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भाजपा सरकारच्या कामामुळे भारताचे भविष्य बदलेल

भाजपा सरकारच्या कामामुळे भारताचे भविष्य बदलेल

=केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन=
Nitin-Gadkari1नाशिक, [३ एप्रिल] – केंद्रातील भाजपा सरकारने अंमलात आणलेल्या आर्थिक धोरणांमुळे देशात पाच वर्षात पाच कोटी रोजगार निर्माण होतील. केंद्रासह राज्य सरकारच्या चांगल्या कामांमुळे भारताचे भविष्य बदलेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे व्यक्त केला.
भाजपा प्रदेश कार्य समितीच्या बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी खा. राकेशसिंहजी, राष्ट्रीय सचिव श्याम जाजू, राज्यातील मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार व माजी प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, भाजपाने रोजगार निर्माण करणार्‍या आर्थिक धोरणावर भर दिला आहे. त्यामुळे भारताचे भविष्य बदलेल. विरोधी पक्षांनी आतापर्यंत केवळ जातीय विष कालविण्याचे राजकारण केले. त्यांना विकासामध्ये रस नाही. त्यांच्या सध्याच्या प्रचारामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये. शेतकरी, युवक, महिला, दलित अशा घटकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक योजनांचा आढावा त्यांनी घेतला. तसेच केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजनांची माहिती घ्यावी व त्यांचा जनतेमध्ये प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली सरकार व संघटनेचे काम योग्य दिशेने चालू आहे, असे सांगत राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे गडकरी यांनी विशेष कौतुक केले.
बैठकीच्या दुसर्‍या सत्रात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती देणारे सादरीकरण केले. कामामध्ये राज्य सरकार कोठेही कमी पडत नाही. कार्यकर्त्यानी सरकारच्या कामांची माहिती घेऊन ती जनतेपर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजकीय ठराव मांडला. आपले केंद्र सरकार व राज्य सरकार विकासाचे काम प्रभावीपणे करत आहे. त्या कामाकडे दुर्लक्ष होण्यासाठी व विकासाचे राजकारण होऊ नये यासाठी विरोधी पक्ष निरर्थक मुद्यांची चर्चा करून भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेने विकासाचा अजेंडा कायम ठेवण्यास साथ द्यावी, असे ते म्हणाले. त्यांना प्रदेश सरचिटणीस आ. अतुल भातखळकर यांनी अनुमोदन दिले.
पहिल्या सत्रामध्ये उद्‌घाटन समारंभानंतर महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शेतीविषयक ठराव मांडला. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनेची माहिती देत केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. त्यांना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27702

Posted by on Apr 4 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (529 of 2451 articles)


=मुस्लिम महिलांनी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा= रियाध, [३ एप्रिल] - भारत मातेचा जयजयकार करण्यावरून काही कट्टरपंथी मुस्लिम नेते ...

×