Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतमातेचा जयघोष करण्यात अडचण काय?

भारतमातेचा जयघोष करण्यात अडचण काय?

  • नजमा हेपतुल्ला यांचा सवाल
  • जी अन्न, पाणी देते ती आईच!

najma_heptullahनवी दिल्ली, [१९ एप्रिल] – ज्या भूमीत आपण जन्मतो, मोठे होतो… जी भूमी आपल्याला अन्न, पाणी देते, जिच्या खुशीत आपण विसावतो, ती भूमी आपली आईच असते. भारतभूमी आपली माताच आहे. तिचा जयजयकार करण्यास आपल्याला कोणतीही अडचण जायला नको, असे स्पष्ट करताना मुस्लिमांना देखील ‘भारत माता की जय’ म्हणण्यास काहीच आक्षेप नाही, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्ला यांनी केले.
हिंदूसह अन्य धर्मियांप्रमाणेच मुस्लिमही याच भारतभूमीत राहतात. देशाची फाळणी झाली, तेव्हा त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचा या भूमीशी जन्मापासूनचा संबंध आहे. ही हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचीही मातृभूमी आहे. आयुष्याच्या शेवटी याच मातेच्या कुशीत आपण विसावत असतो. ही सत्यता असताना ओेवैसीसारख्या लोकांना भारतमातेचा जयजयकार करण्यात अडचण काय आहे, असा सवाल हेपतुल्ला यांनी केला.
याच मातीत पिकलेले अन्न आपण खातो, पाणी पितो, येथील मोकळ्या हवेत आपण श्‍वासही घेतो. आपल्याकडे भाषा, प्रांत आणि धर्म वेगवेगळे असले, तरी भूमी एकच आहे. विदेशी भूमीतही तिथे राहणारे लोक त्या भूमीला आपली माता समजतात आणि जयजयकार करतात, असे सांगताना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा विकासाचा आहे. पण, ओवैसीसारख्या लोकांना विकास नको असल्याने मोदी सरकारला विकासाच्या मार्गावरून हटविण्याचा कट त्यांनी रचला आहे. आम्ही त्यांचा कट कधीच यशस्वी होऊ देणार नाही.
नरेंद्र मोदी यांचे धोरण अल्पसंख्यकांच्या विरोधात आहे, असा आरोप विरोधी पक्ष करीत असतात. पण, अलीकडेच सौदी नरेशांनी अल्पसंख्यकांचे आयुष्यमान उंचावण्याच्या मोदी यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचा सौदी अरबमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान केला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27904

Posted by on Apr 20 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (465 of 2453 articles)


=रविशंकर प्रसाद यांचा आरोप= कोलकाता, [१९ एप्रिल] - लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब असलेल्या इशरत जहॉं प्रकरणी तत्कालीन कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारने निवडणूक ...

×