Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतरत्न मिळाल्याने अटलजींच्या गावी जल्लोष

भारतरत्न मिळाल्याने अटलजींच्या गावी जल्लोष

atalbihari bajpayeejiआग्रा, [२८ मार्च] – भाजपाचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर बाटेश्‍वर या त्यांच्या पूर्वजांच्या गावी मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
राजशिष्टाचाराला फाटा देत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी सायंकाळी अटलजींचे निवासस्थान गाठले आणि त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान केला. यानंतर लगेच आग्रा जिल्ह्याच्या बाह तहसिलीतील या गावकर्‍यांनी घरोघरी जाऊन मिठाईचे वाटप केले आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजीही केली.
वाजपेयी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याने आम्ही फार आनंदी आहोत. त्यांच्यासारखा नेता या देशाला मिळाला, हे फार मोठे भाग्य आहे. या सर्वोच्च सन्मानासाठी अटलजींची निवड केल्याबद्दल आम्ही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे ऋणी आहोत, अशी प्रतिक्रिया गावकर्‍यांनी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21793

Posted by on Mar 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1835 of 2453 articles)


सॅन फ्रॅन्सिस्को, [२८ मार्च] - इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगलने आपले सीएफओ अर्थात मुख्य वित्त अधिकारी म्हणून रूथ पोराट यांची ...

×