Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारताचा आर्थिक विकास दर ७५ टक्के

भारताचा आर्थिक विकास दर ७५ टक्के

=चीनलाही टाकले मागे=
growthgraphनवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] – चालू आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरला संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला असून, याबाबत भारताने चीनलाही मागे टाकले टाकताना आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट केली आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढत जाणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे आधार वर्षात परिवर्तन आणि नवीन गणना प्रणालीअंतर्गत चालू आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरला संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत भारताचा विकास दर तब्बल ७.५ टक्के राहिला. या दरम्यान चीनचा विकास दर ७.३ टक्के होता. भारत चीनला मागे टाकेल, असे भाकीत जुन्या गणनेच्या आधारे जागतिक बँकेने केले होते, हे विशेष. तसेच २०१७ पर्यंत भारत व चीनचा आर्थिक विकास दर बरोबरीत राहील, असेही जागतिक बँकेने म्हटले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20466

Posted by on Feb 10 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2079 of 2453 articles)


एचएसबीसी बँकेतून माहिती फुटली राजकारणी, उद्योगपती, अभिनेत्यांचीही नावे नवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] - कर बुडव्यांकरिता नंदनवन अशी ओळख असलेल्या ...

×