Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध नव्या उंचीवर: मोदी

भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध नव्या उंचीवर: मोदी

Narendra Modi addressing at the Joint Press Statement, in Colombo, Sri Lankaकोलंबो, [१४ मार्च] – भारताने जागतिक पातळीवर मिळविलेल्या विश्‍वासामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांना नवी उंची मिळाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.
श्रीलंका आणि भारत या दोन देशातील द्विपक्षीय संबंधावर चिंता व्यक्त होत असली, तरी व्यापारात असलेले असंतुलन दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पंतप्रधान म्हणाले. दीर्घकालीन आर्थिक भागीदारी करारासाठी (सीईपीए) दोन्ही देशांनी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. भारताचा मजबूत आर्थिक भागीदार होण्याची श्रीलंकेची क्षमता असून, भारताच्या मोठ्या अर्थव्यवस्थेची काळजी करण्याची गरज नसल्याचे यावेळी नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या व्यावसायिक समुदायासमोर बोलताना स्पष्ट केले.
मोदी म्हणाले की, दोन देशातील व्यापारी संबंधात फार मोठी तफावत असली तरी परस्पर चर्चा करण्याची तयारी आहे. आम्हाला समतोल विकास हवा आहे. भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी तुम्हाला आवश्यक सहकार्य करण्याची तयारी आहे. शेजारी राष्ट्राशी असलेल्या संबंधांवरच कोणत्याही देशाची प्रगती अवलंबून असते. दक्षिण आशियातील श्रीलंका आमचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. दोन देशांनी आपली ताकद आणि संधीचा योग्य उपयोग केल्यास याचा परस्परांना फायदाच होईल, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21447

Posted by on Mar 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1915 of 2458 articles)


नागपूर, [१४ मार्च] - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची याच पदावर पुढील तीन वर्षांसाठी फेरनिवड ...

×