Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारताचे एनएसजीतील सदस्यत्व मजबूत

भारताचे एनएसजीतील सदस्यत्व मजबूत

=अमेरिकेनेही जाहीर केला पाठिंबा=
NSG-Nuclear-Suppliers-Groupवॉशिंग्टन, [७ जून] – ४८ सदस्यीय न्यूक्लियर सप्लायर्स गु्रपमध्ये (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला अमेरिकेनेही आज मंगळवारी आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे या गटातील भारताचा प्रवेश आता जवळजवळ सुकर झाला आहे. दक्षिण आशियात बलाढ्य असलेल्या भारताच्या प्रवेशामुळे अण्वस्त्र प्रसारबंदीसारख्या मुद्यांवर जगाचा फायदाच होणार आहे, असे अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन्जामिन र्‍होड्‌स यांनी याबाबतची माहिती दिली. ४८ सदस्यीय एनएसजीमध्ये भारताला प्रवेश देण्यास चीन आणि पाकिस्तानसह काही देशांचा विरोध असताना, र्‍होड्‌स यांनी विशद केलेली भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, सोमवारी स्वित्झर्लंडनेही भारताच्या सदस्यत्वाचे जोरदार समर्थन केले होते.
भारताने आजवर अण्वस्त्र प्रसार रोखण्याचेच काम केले आहे. भारतासोबत आम्ही नागरी अणुऊर्जा करार केला आहे. तसेच अण्वस्त्र सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावरही आम्ही नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे भारतासारखा देश एनएसजीमध्ये येणे, ही चांगली बाब असल्यानेच आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताने गेल्या महिन्यात एनएसजीचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी अर्ज केल्यानंतर पाकिस्तानेही आपला अर्ज सादर केला. पाकचा मार्ग सुकर करण्यासाठीच चीनने भारताच्या उमेदवारीला विरोध केला होता. स्वित्झर्लंड आणि मेक्सिकोचाही भारताला विरोध होता. पण, स्वित्झर्लंडने सोमवारी आपला पाठिंबा जाहीर करून चीनलाही आश्‍चर्याचा धक्का दिला.
जपानचाही पाठिंबा
दरम्यान, जपाननेही भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा जाहीर करून, अन्य देशांचेही मन वळविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भारताला एनएसजीमध्ये सदस्यत्व मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे, असे जपानचे भारतातील राजदूत केंझी हिरामत्सू यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28531

Posted by on Jun 8 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (261 of 2458 articles)


मुंबई, [७ जून] - राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी जलसंपत्तीचे एकात्मिक नियोजन आवश्यक असून त्यासाठी या विषयाशी संबंधित पाणी ...

×