Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताच्या अण्वस्त्रांची पाकला धास्ती

भारताच्या अण्वस्त्रांची पाकला धास्ती

हल्ल्याची भीती असल्यानेच जमविली अण्वस्त्रे
पाकिस्तानने प्रथमच जाहीर कबुली
Pakistan-foreign-secretary-ejaz-chaudhryइस्लामाबाद, [२१ ऑक्टोबर] – युद्ध झाल्यास भारताचे फार मोठे नुकसान करू, अशी वारंवार धमकी देणार्‍या पाकिस्तानने भारताच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांची चांगलीच धास्ती घेतली आहे. अण्वस्त्र आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या भारताकडून युद्धाचा सर्वाधिक धोका आहे. राष्ट्रीय सुरक्षा जोपासण्यासाठीच आम्हीदेखील अण्वस्त्र व क्षेपणास्त्रे जमा केली आहेत, अशी जाहीर कबुली पाकने प्रथमच दिली आहे.
सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उद्या गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते द्विपक्षीय चर्चा सुरू करण्यासाठी अमेरिकेने भारतावर दबाव आणावा, असे साकडे घालणार आहेत. याच पार्श्‍वभूमीवर पाकचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी मंगळवारी केवळ पाकिस्तानातील काही निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले की, युद्धाच्या स्थितीत भारताने जो ‘कोल्ड स्टार्ट’ (शांत आणि संयमी सुरुवात करणारा) सिद्धांत अवलंबला आहे, तो घातक असाच आहे. या सिद्धांतामुळे युद्धाचा धोका फार जास्त वाढला आहे. अशा स्थितीत देशाचे रक्षण करण्यासाठी अण्वस्त्र व क्षेपणास्त्रे जमा करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नव्हताच.
भारताने अचानक आक्रमण केल्यास, त्यांना तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सीमाभागात क्षेपणास्त्र व अण्वस्त्रांकरिता पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. आमच्याकडेही आता अनेक लहान आणि मध्यम स्वरूपाची क्षेपणास्त्रे असल्याने भारत आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी वारंवार विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, भारताच्या अण्वस्त्र व क्षेपणास्त्रांची पाकने धास्ती घेतली आहे, हे पाक सरकारतर्फे जाहीरपणे मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या आक्रमणाचा सामना करणे आम्हाला शक्य व्हावे, यासाठी आम्ही आवश्यक ते सर्वच उपाय करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, २०२० पर्यंत पाककडे २०० पेक्षा जास्त अण्वस्त्रे असतील, असा दावा अलीकडेच अमेरिकेतील एका अभ्यासपूर्ण अहवालात करण्यात आला होता.
‘कोल्ड स्टार्ट’ सिद्धांत म्हणजे काय
‘कोल्ड स्टार्ट’ सिद्धांत म्हणजे युद्धाच्या काळात लष्कराची व्यूहरचना कशी असेल, याचे सूचक धोरणच आहे. पाकसोबत युद्ध छेडले गेल्यास क्षणातच ठोस प्रत्युत्तर देण्याची ही व्यूहरचना आहे. याचा मुख्य उद्देश, युद्धात आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करण्यापूर्वीच पाकला सडेतोड उत्तर मिळालेले असेल. असे करताना पाक कोणत्याही स्थितीत अण्वस्त्र हल्ल्यासाठी प्रोत्साहित होणार नाही, याची काळजीही या सिद्धांतांतर्गत घेण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25235

Posted by on Oct 22 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1314 of 2458 articles)


=बिहार निवडणुक जिंकणे भाजपासाठी आवश्यक= नवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] - बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाले, ...

×