Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » भारताच्या कारावासातून १८९ पाककैदी हरवले?

भारताच्या कारावासातून १८९ पाककैदी हरवले?

danger-prisoner-in-cartoon-styleनवी दिल्ली, [२ जानेवारी] – भारतातील तुरूंगातून पाकचे १८९ कैदी हरविल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. यात मासेमारांसह पाकमधील नागरिकांचाही समावेश आहे. हा मुद्दा भारत – पाकिस्तानमध्ये २५ जानेवारी रोजी होणार्‍या विदेश सचिवांच्या बैठकीत उपस्थित करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत – पाकिस्तानमध्ये ३१ मे २००८ रोजी एक करार झाला होता. त्यानुसार वर्षातून दोन वेळा भारताने पाकच्या तर पाकने भारताच्या ताब्यात असलेल्या कैद्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागते. दोन्ही देश दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये ही माहिती परस्परांना पाठवित असतात.
दरम्यान, जानेवारी महिना लागताच भारताने पाकिस्तानला कैद्यांबाबत माहिती दिली. त्यानुसार भारताच्या ताब्यात पाकचे १७ मासेमारांसह एकूण २७१ कैदी आहेत. मात्र, पाकिस्तानने दिलेल्या माहितीबाबत आक्षेप घेतला आहे. पाकने दावा केला आहे की ११३ मासेमारांसह एकूण ४६० कैदी भारताच्या ताब्यात आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26372

Posted by on Jan 3 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (952 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ जानेवारी] - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खाद्यांवर लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते. पुढील आठवड्यात आपली ...

×