Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » भारताच्या चांगल्या कामावर कोणीच बोलत नाही

भारताच्या चांगल्या कामावर कोणीच बोलत नाही

=डोनॉल्ड ट्रम्प यांची स्तुतिसुमने=
donald_trumpवॉशिंग्टन, [२७ जानेवारी] – अमेरिकन राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांनी प्रथमच भारताचे गुणगाण केले आहे. अलीकडील काही वर्षांच्या काळात भारत चांगले काम करीत असतानाही, त्याविषयी कोणीच बोलताना दिसत नाही, असे डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचाराच्या आपल्या भाषणांमध्ये आतापर्यंत चीन, मेक्सिको आणि जपानसह अनेक देशांवर प्रखर टीका केली आहे. याशिवाय, अमेरिकेत मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्यासंदर्भातही त्यांनी वक्तव्य केले होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. प्रचारातील आपल्या भाषणात ट्रम्प यांनी प्रथमच भारताचा उल्लेख केला आहे.
भारताची अलीकडील काळातील कामगिरी खरोखरच चमकदार आहे. हा देश चांगले काम करीत आहे. पण, त्याविषयी कुणीही काहीच बोलताना दिसत नाही. तिथेच आता आपल्या देशाकडे बघा. जगभरात अमेरिकेची चेष्टा होत आहे. जगातील सर्वांत मोठी शक्ती म्हणून अमेरिकेला मान मिळायचा. पण, आता चित्र बदलले आहे. जग आता अमेरिकेवर हसत आहे, ही खूप दु:खद बाब आहे. मी भारत, चीन, मेक्सिको आणि जपानबद्दल जे काही बोललो होतो, ते आता सत्य होताना दिसत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26662

Posted by on Jan 29 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (872 of 2458 articles)


=अतिरेक्यांच्या चौकशीतून खुलासा= नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - राजकीय नेत्यांची हत्या करून केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकार अस्थिर करण्याची आमची योजना ...

×