Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » भारताजवळ २ हजारपेक्षा अधिक अणुबॉम्ब बनवण्याची सामुग्री

भारताजवळ २ हजारपेक्षा अधिक अणुबॉम्ब बनवण्याची सामुग्री

=पाकिस्तानचा अंदाज=
india-pakistanइस्लामाबाद, [१० सप्टेंबर] – दोन हजारपेक्षा जास्त अणुबॉम्ब बनतील एवढे साहित्य भारताजवळ आहे, असा अंदाज पाकिस्तानने वर्तवला आहे. प्रसिद्धी माध्यमाच्या एका वृत्तात गुरुवारी ही माहिती देण्यात आली.
नॅशनल कमांड ऍथॉरिटी (एनसीए) ने काढलेल्या निष्कर्षानुसार भारताचा वाढता अणुकार्यक्रम आणि युदधाची खुमखुमी यामुळे या क्षेत्रातील स्थिरता धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानला बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी उपाय योजावे लागत असल्याचेही या वृत्तांत सांगण्यात आले.
डॉनमधील वृत्तानुसार पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) ने म्हटले आहे की, देशाच्या अग्रणी नीती निर्धारण संस्थेच्या बैठकीत रणनितीक कार्यक्रमाचा आढवा घेण्यात आला असून शेजारी राष्ट्राच्या वाढलेल्या हालचाली पाहता रणनितीक व पारंपरिक क्षमतेच्या विकासावर विचार करण्यात आला.
भारतात प्लुटोनियमचा साठा वाढत असून २०१३ मध्ये ०८.१ टन वेपन ग्रेड व १५ टन रिऍक्टर ग्रेड प्लुटोनियमचे उत्पादन भारताने केले असून त्यातून दोन हजार अणुबॉम्ब तयार केले जाऊ शकतात, असे आयएसपीआरने इका अहवालात नमूद केले असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आयएसपीआरच्या बैटकीला संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, अर्थमंत्री इशाक डार, अंतर्गत खात्याचे मंत्री चौधरी निसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज,जनरल रशद महमूद, तीनही सेनादल प्रमुख यांच्यासह रणनितीक योजना डिव्हिजनचे डायरेक्टर जनरल उपस्थित होते.
दरम्यान, अमेरिकी थिंक टँक कार्नेजी एडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस ऍण्ड स्टिमसन सेंटरच्या माहितीनुसार पाकिस्तानही गतीने आपला अणुकार्यक्रम वाढवत असून आगामी ५ ते १० वर्षांत त्याच्याजवळ तिसरा सर्वात मोठा अण्वस्त्राचा साठा असेल, असेही डॉनने वृत्त दिले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23749

Posted by on Sep 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1495 of 2458 articles)


=जीएसटीचा तिढा= नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] - कॉंग्रेस पक्षाच्या आठमुठ्या धोरणामुळे वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी हे आर्थिक सुधारणेसाठीचे महत्त्वाचे ...

×