Home » उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय » भारतात अणुइंधनाचे विक्रमी उत्पादन

भारतात अणुइंधनाचे विक्रमी उत्पादन

=१२५२ मेट्रिक टनचा टप्पा गाठला=
atomic-energyनवी दिल्ली, [८ एप्रिल] – आपल्या अणुभट्ट्यांकरिता लागणार्‍या इंधनासाठी आतापर्यंत अन्य देशांवरच अवलंबून राहणार्‍या भारताने यावेळी प्रथमच अणुइंधनाच्या उत्पादन क्षेत्रात विक्रमी भरारी घेतली आहे. देशातील अणुभट्ट्यांकरिता जितक्या अणुइंधनाची गरज असते, त्यापेक्षा दुप्पट उत्पादन करण्यात आले असून, या क्षेत्रात हा मैलाचा दगडच मानला जात आहे.
देशातील ‘हेव्ही वॉटर रिऍक्टर’करिता वार्षिक ६५० मेट्रिक टन इतक्या अणुइंधनाची गरज भासत असते. पण, यावर्षी भारताने १२५२ मेट्रिक टन अणुइंधनाची निर्मिती केली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांची चिंता दूर झाली आहे.
अणुभट्ट्यांकरिता इंधनाची निर्मिती करणार्‍या हैदराबाद येथील अणुऊर्जा संकुलात २०१३-१४ या वर्षात ९६१.२३ मेट्रिक टन इंधनाची निर्मिती करण्यात आली होती. एकूण गरजेपेक्षा ही निर्मिती ३० टक्के जास्त होती. त्यानंतर २०१४-१५ या वर्षात आम्ही जवळजवळ दुप्पट इंधनाची निर्मिती केली, अशी माहिती या प्रकल्पाचे मुख्य अभियंता एन. साईबाबा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
आतापर्यंत आपला देश अणुइंधनासाठी अन्य देशांवर अवलंबून होता. पण, यावेळी आपण विक्रमी उत्पादन केले असल्याने देशातील अणुभट्ट्यांकरिता नवा श्‍वास घेणारेच हे वृत्त आहे. या प्रकल्पाची सुरुवातीची निर्मिती क्षमता १०० मेट्रिक टन इतकीच होती. आम्ही ती टप्प्याटप्प्याने वाढविली, अस त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21937

Posted by on Apr 9 2015. Filed under उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उर्जा, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1810 of 2453 articles)


नवी दिल्ली, [८ मार्च] - बोगस रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि मध्यस्थांपासून घर खरेदी करणार्‍यांना आवश्यक ते संरक्षण प्रदान करण्याची तरतूद ...

×