Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतात इसिसवर बंदी

भारतात इसिसवर बंदी

home_ministryनवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – अतिशय जहाल दहशतवादी गट अशी ओळख असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया म्हणजेच इसिसवर भारत सरकारने आज गुरुवारी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातली.
या दहशतवादी संघटनेत भारतीय तरुणांची भरती होणे आणि संघटनेच्या जहाल विचारांचा प्रचार भारतात होणे अतिशय चिंतेची बाब असून, या संघटनेत भरती झाल्यानंतर देशात परतणार्‍या लोकांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने इसिसवर बंदी घालणारा आदेश जारी करताना स्पष्ट केले.
इसिस आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या सर्वच गटांना आम्ही दहशतवादी म्हणून जाहीर करीत आहोत आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत या सर्वच गटांच्या हालचाली राष्ट्रविरोधी ठरवून, या गटांवर बंदी घालण्यात येत आहे, असे गृहमंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.
गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मध्य-पूर्व गटावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारानुसार बंदी जाहीर केली होती. त्यानंतर आता इसिसवरही बंदी घालण्यात आली आहे. ही संघटना भारतासह अनेक देशांमधील तरुणांची दिशाभूल करीत आहे आणि आपले विषारी विचार पसरवित आहे. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन या संघटनेत भरती होणार्‍या तरुणांवर आमची अतिशय करडी नजर राहणार आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20902

Posted by on Feb 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2007 of 2453 articles)


=जेटलींचा विरोधकांना टोला= नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] - सरकारच्या सुधारित भू-संपादन विधेयकाचे आज गुरुवारी राज्यसभेत जोरदार समर्थन करताना अर्थमंत्री अरुण ...

×