भारतात गुंतवणूक करा

=जेटलींचे ऑस्ट्रेलियन व्यावसायिकांना आवाहन=
Arun Jaitley9सिडनी, [३० मार्च] – मेक इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑस्ट्रेलियन व्यावसायिकांना केले आहे. भारतात रेल्वे, संरक्षण आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, सरकारने यासाठी पूरक वातावरण निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले
भारताच्या विकासात ऑस्ट्रेलियन उद्योजकांनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून गुंतवणूक करावी आणि यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो, असे त्यांनी आपल्या दौर्‍याच्या चौथ्या दिवशी येथील उपस्थितांना सांगितले. भारतात विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी तुमची वाट बघत असून, हे क्षेत्र आता विदेशी गुंतवणूकदारांसाठी खुले करण्यात आले असल्याचे त्यांनी ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री ज्युली बिशॉप यांना सांगितले. द्विपक्षीय मुद्यांवरही यावेळी त्यांनी चर्चा केली. मागील २२ महिन्यांच्या काळात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहितीही त्यांनी दिली. जागतिक पातळीवर मंदी दिसून येत असताना, सलग दोन वर्षे आमच्या देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करीत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारताच्या विकासात ऑस्ट्रेलिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे यावेळी बिशॉप म्हणाले. अरुण जेटली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांची गुरुवारी भेट घेणार आहेत.
जेएनयुसारख्या घटनांमुळे भारताच्या प्रतिमेवर परिणाम नाही
जेएनयुसारख्या घटनांमुळे विदेशातील भारताच्या प्रतिमेवर परिणाम होणार नसल्याचे अरुण जेटली यांनी म्हटले आहे. देशाच्या एकात्मतेला तडा लावणार्‍या अशा घटना कोणताही देश सहन करू शकत नाही. भारत उदारमतवादी राष्ट्र आहे. आमच्या राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले असले, तरी देशाच्या सार्वभौमत्वावरील आघात याला अपवाद असल्याचे अरुण जेटली म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27649

Posted by on Mar 31 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ऑस्ट्रेलिया, ठळक बातम्या (550 of 2458 articles)


दुलिआजन (आसाम), [३० मार्च] - बांगलादेशातून आसामात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकार भारत-बांगलादेश सीमा पूर्णपणे बंद करणार आहे. याआधीचे ...

×