Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारतात गुंतवणूक करा!

भारतात गुंतवणूक करा!

=सुषमा स्वराज यांचे अमेरिकन उद्योजकांना आवाहन=
Sushma-Swaraj2नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] – भारतात अनेक क्षेत्रात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध असल्याने अमेरिकी उद्योजकांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे.
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे दोन्ही देशांना फायदाच होईल, असे त्यांनी अमेरिका-भारत व्यापार परिषदेच्या (यूएसआईबीसी) आयोजित कार्यक्रमात बोलतांना सांगितले. अमेरिकन उद्योगपतींना देशात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. १०० स्मार्ट सिटी, गंगा स्वच्छता अभियान यासारख्या योजना सरकार राबवित आहे आणि २०२२ पर्यंत ३० कोटी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यावर आमचा भर आहे. नवीन सरकारने पहिल्या दिवसापासूनच इतर देशांबरोबर व्यापार वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरीकरणाला प्रोत्साहन देण्याची आमची योजना आहे. स्वस्त दरात विद्युतपुरवठा आणि स्वस्त घर ही आमची प्राथमिकता आहे. यामुळे अमेरिकन उद्योगपतींना भारतात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, दोन देशांनी भागीदारीच्या माध्यमातून विकास साधावा, असे आवाहन सुषमा स्वराज यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24017

Posted by on Sep 23 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1421 of 2453 articles)


=तुमच्या एक इंचाची फूटपट्टी किती मोठी : व्यंकय्या नायडू यांचा राहुल गांधींना सवाल= नवी दिल्ली, [२२ सप्टेंबर] - देशावर तब्बल ...

×