Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » भारतात फेसबुक यूजर्सची संख्या साडेबारा कोटी

भारतात फेसबुक यूजर्सची संख्या साडेबारा कोटी

facebook1नवी दिल्ली, [३० जून] – भारतीय युवकांमध्ये सध्या सोशल नेटवर्किंग जबरदस्त लोकप्रिय आहे. त्यात व्हॉट्‌स ऍपसोबतच फेसबुक वापरणार्‍यांची संख्याही बरीच जास्त आहे. फेसबुक वापरणार्‍यांची संख्या साडेबारा कोटींवर गेल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. गेल्या सहा महिन्यात फेसबुक वापरणार्‍यांची संख्या सव्वा कोटींनी वाढली आहे.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात भारतात फेसबुक वापरणार्‍यांची संख्या ११ कोटी २० लाख एवढी होती. जगभरात फेसबुकचा सर्वाधिक वापर करण्यात अमेरिकेनंतर भारताचाच क्रमांक लागतो. फेसबुक वारंवार आपल्या सेवांमध्ये वैविध्य देण्याचा प्रयत्न करीत असून त्यामुळेही युझर्स त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. सोमवारीच फेसबुकने कमी गतीने चालणार्‍या इंटरनेट कनेक्शनचा वापर करणार्‍यांसाठी नवे ‘टु जी फ्रेंडली ऍप’ आणले असून त्याचे नाव ‘फेसबुक लाईट’ असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, नव्याने फेसबुकशी जोडलेल्या आणि कमी गतीचे इंटरनेट वापरणार्‍यांनाही फेसबुक सहजतेने वापरता येणार आहे. ‘फेसबुक लाईट’चे भारतातील प्रमुख विजय शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या साडेबारा कोटी लोक फेसबुक युझर्स असून त्यापैकी ११ कोटी ४० लाख लोक मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक वापरत आहेत.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर दिवशी ५ कोटी ९० लाख भारतीय फेसबुकचा वापर करतात. त्यात, मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक वापरणार्‍यांची संख्या लक्षणीय असून ती ५ कोटी ३० लाख इतकी आहे. भारतात ८० टक्के लोक टु जी नेटवर्कचा वापर करीत असल्याने ‘फेसबुक लाईट’ला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23174

Posted by on Jul 1 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1589 of 2453 articles)


=आरटीआय अंतर्गत खुलासा= नवी दिल्ली, [३० जून] - स्वत:ला आम आदमी म्हणवून घेणारे आणि साधेपणाचा आव आणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद ...

×